डोंबिवलीतील एक दोन नाही तर सुमारे साडे सहा हजार कुटुंब येत्या काही दिवसात बेघर होणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या ६५ इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील ६५ इमारती जमीन दोस्त होणार आहेत. यातील डोंबिवली कोपर येथील साई गॅलेक्सी या इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या सर्वच इमारतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत.
“लाखोंचे कर्ज घेऊन घर घेतले घर घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज दिले, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला, महापालिकेचा टॅक्स लागला, असे असतानाही आमच्या इमारती अनधिकृत असल्याचे जाहीर करत आम्हाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, याच वेळी आमची फसवणूक करणारा बिल्डर मात्र मोकाट फिरत आहे आम्हाला न्याय द्या,” अशी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
डोंबिवलीमधील एलिट टॉवर, द्रौपदी हाईट्स, विनायक सृष्टी, मनुस्मृती अपार्टमेंट, शांताराम आक्रेड, डीएचपी गॅलेक्सी, गावदेवी हाईट्स, शिवसाई बालाजी बिल्टकॉन, साईन एन्क्लेव्ह आणि इतर काही अवैध इमारतींनी बिल्डिंग नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. या अर्जावर निर्णय होईपर्यंत कारवाई होऊ नये, अशी विनंती इमारतीच्या नागरिकांनी हायकोर्टात केली. पण हायकोर्टाने गॅलेक्सी इमारतीचा अर्ज फेटाळला असून इतर इमारतींसाठीही तोच निर्णय असेल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘माझी लाईन पुसण्यापेक्षा तुमची लाईन मोठी करा’ उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची उबाठावर टीका
दे धक्का ! नाशिकमध्ये मनसेला पुन्हा एकदा खिंडार पडणार