मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘नशामुक्त नवी मुंबई अभियान प्रारंभ’ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तरुणाई ही आपल्या राष्ट्राची ऊर्जा असून समाज आणि देशाच्या विकासात तरुणांच्या शक्तीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी नशामुक्त अभियानात सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी नशामुक्त नवी मुंबई अभियानाला आजपासून प्रारंभ झाला आहे.
वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, यासंदर्भातील माहिती प्राप्त करुन संशयितांवर कारवाई करणे हे या अभियानामध्ये उद्दिष्ट असेल. नवी मुंबईपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे, पुढे इतरही ठिकाणी सुरु होणार आहे. ड्रग्ज विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक मोठी लढाई सुरु झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील ही लढाई आपण लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या ड्रग्ज विक्री विरोधात देखील मोहिम सुरु केली आहे. अपराधी नवीन नवीन पद्धती शोधत आहेत, पण पोलीस ते शोधून काढत आहेत आणि कारवाई करत आहेत. नवी मुंबई आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाने गेल्या दोन वर्षांत ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली आहे. पंजाबसारखा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचे काम सुरु आहे त्याविरुद्ध आज जर कारवाई केली तर त्याला थांबवू शकतो.”
हे ही वाचा:
लग्नानंतर पुन्हा एकदा दिसणार पीव्ही सिंधू, ‘या’ टूर्नामेंटने २०२५ वर्षाची करणार सुरुवात