येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार असली तरी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज ३ डिसेंबरला दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या ज्युपिटर रुग्णालयात काही चाचण्या करण्यात आल्या. एकनाथ शिंदे ताप, सर्दी, आणि घशाचे इन्फेक्शन झाले आहे तसेच शरीरातील पांढऱ्या पेशी कमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या रक्ताच्या काही तपासण्या केल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते वर्ष बंगल्याकडे रवाना झाले. सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते तेव्हादेखील एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे.
ज्युपिटर रुग्णालयातील तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मोजक्या शब्दांमध्ये एकनाथ शिंदेनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझी तब्येत चांगली आहे. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शिंदेंच्या प्रकृती आता बारी असल्याची माहिती दिली आहे.
ज्युपिटर रुग्णालयातून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट वर्षा या शासकीय बंगल्यावर रवाना झाले. सध्या आमदार दीपक केसरकर, उदय सामंत, संजय शिरसाट, राहुल शेवाळे आदी राजकीय नेते वर्षा या निवासस्थानी हजर असल्याची माहिती समोर आली आहे. तर गुलाबराव पाटील वर्षावर दाखल झाले आहेत.
हे ही वाचा:
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर; उदय सामंतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
जरांगेचा पुन्हा एल्गार ! मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घ्यायला सज्ज ?। Manoj Jarange | Eknath Shinde