Avinash Jadhav Exclusive Interview: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टाईम महाराष्ट्राला (Time Maharashtra) दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात गेली अनेक वर्षे एक मैत्री आहे. ठाणे महापालिकेतील सत्ता बनविणे किंवा इतर प्रकल्पांविषयी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितले तर त्याकडे फार दुर्लक्ष मुख्यमंत्री करत नाहीत. या दोन्ही नेत्यांच्या मध्ये सध्या काही बेबनाव झालेला दिसत आहे. याचा फटका तुम्हाला बसणार का? असा प्रश्न विचारला असता अविनाश जाधव म्हणाले, “मला माहित नाही. या प्रश्नांच उत्तर माझ्याकडे नाही. पण मी जो मतदार म्हणून पाहतो. कोण कोणासोबत आहे, हे पाहत नाही. मतदार माझ्याबद्दल काय विचार करतो हे मी पाहतो. मतदार मनसे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यापैकी कोणाचाही मतदार असो, त्यांची विचारधारा काम करणाऱ्या माणसासोबत आहे. जर त्यांचा उमेदवार नसेल तर मतदार नक्कीच मला चॉईस करेल.” असे ते म्हणाले.
अविनाश जाधव म्हणजे आंदोलने, राडा… अविनाश जाधव म्हणजे राज ठाकरेंच्या डोक्याला ताप असं अठरा वर्षे आम्ही पाहतोय हे जपणं तुम्हाला सोप्प गेला कि कठीण? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “मला माहित नाही तुम्ही मला काय नजरेने बघता? मला आंदोलनकार म्हणून पाहताय, पण तुम्ही २ हजार ५०० मुलींची लग्न लावून दिली हे का सांगत नाही? मी आतापर्यंत साडेतीनशेच्या वरती वयोवृद्ध लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन ज्युपिटर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी केली. मुलींना शाळेत जाण्यासाठी साडेतीनशे सायकल वाटप केले. एक ज्योती नावाची मुलगी ट्रेनमधून पडली. तिचे दोन्ही पाय गेले. त्यावेळेस डॉक्टरांचा संप चालू होता. त्यामुलीला उचलून ठाण्यात आणून तिचे ऑपरेशन केलं. आज ती रोबोटिक पायांवर उभी राहात आहे. याचा उल्लेख तुम्ही का नाही करत? तुम्ही माझं आंदोलनचं का दाखवत आहात? ज्यावेळी कामगारांना पगार दिले गेले नाही तेव्हा मी माझ्या कंपनीच्या अकाऊंटमधून २५ लाख रुपये काढले आणि त्या कामगारांना वाटले. मी रोज अनेक शाळकरी मुलींच्या शाळेच्या फीज भरतो. मी अनेकांचे हॉस्पिटलचे बिल रोज भरतो. हे सर्व तुम्ही का दाखवता? तुम्ही मला फक्त आंदोलन करतानाच का दाखवता? यांच्यापलीकडेसुद्धा अविनाश जाधव आहे.”
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…