spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Avinash Jadhav Exclusive Interview: मला मतदारांच्या दारात मत मागायला जायची गरज नाही, कारण…

Avinash Jadhav Exclusive Interview: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी टाईम महाराष्ट्राला (Time Maharashtra) दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोठ्या राजकीय गोष्टींचा खुलासा केला आहे.

ठाणेकर हे नेहमीच डोळ्यावर पट्टी बांधून शिवसेनेवर विश्वास ठेवायचे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवणारे ठाणेकर आता कूस बदलतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “का नाही बदलणार? यावेळी मी १ लाख मते क्रॉस करणार. मागच्या वेळेस मला ७० हजार मते पडली. आणि फक्त मलाच नाही तर ठाण्यातील इतर दोन मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांनादेखील २५ हजार मते आहेत. म्हणजे सेवा लाख ते दिड लाख मतं मी फक्त ठाणे शहरात घेतली आहेत. जर शिवसेनेला ठाण्यातील तिन्ही विधानसभेत एकूण तीन लाख मते पडली आहेत. तर मलापण दिड लाख मत आहेत. म्हणजे प्रत्येक दोन माणसातला एक माणूस आमच्यावर प्रेम करतोय. आम्हाला मतदान करतोय.”

ठाण्यासाठी पंचसूत्री काय असणार? यावर उत्तर देताना ते म्हणाले, “माझं व्हिजन एकदम क्लिअर आहे. माळ तीन चार गोष्टी प्रामुख्याने ठाण्यात करायच्या आहेत. ठाण्यात टँकर लॉबी खूप मोठ्या प्रमाणात उभी राहत आहे. ठाण्यात पाणी नाहीये. आणि मोठंमोठ्या सोसायट्यांमध्ये सव्वा लाख ते दिड लाखांचं पाणी लोक घेतात. आमची ठाणे महानगरपालिका अशी एकमेव महापालिका आहे ज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपये असूनदेखील आमचं पाण्याचं धरण नाही. बावीस वर्षांपासून जे पाण्याचं धरण बांधायचं राहिलाय ते मी आल्यावर बांधीन. साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ठाण्यात फिरण्यासाठी तीन ठिकाणे नाही आहेत. मला ते उभं करायचं आहे. दुबईतल्या फाउंटन शोप्रमाणे मला ठाण्यातल्या तलावपाळीला करायचं आहे. मी ठाण्यात उत्तम दर्जाचं संग्रहालय बणवीन. भविष्याच्या काळात यूपीएससी, एमपीएससीसाठी मी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बनवेन. ठाणे हि कलानगरी आहे. ठाण्यातील प्रत्येक तलावांशेजारी शनिवार – रविवारी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. पाच वर्षांत एवढं उत्तम काम कारेन कि पुढच्या निवडणुकीत मला लोकांच्या दारात मत मागण्यासाठी जावं लागणार नाही. लोक मला मतदान करतील.”

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss