उल्हासनगरचं शासकीय रुग्णालयात मागील तीन तासांपासून वीज नसल्यामुळे अंधारात आहे. यामुळे रुग्णालयात रुग्ण त्रस्त झाले आहेत.
मोठी बातमी समोर आली आहे. उल्हासनगरचं शासकीय रुग्णालय मागील तीन तासांपासून वीज नसल्यामुळे अंधारात आहे. यामुळे रुग्णालयात रुग्ण त्रस्त झाले आहेत. जनरेटरचा बॅकअप सुद्धा मिळणं मुश्कील झालं आहे त्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती सर्व काही बंद झाले आहे. सुदैवानं आयसीयूमध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयूमधील मशिनरी सुरू आहेत. त्या व्यतिरिक्त रुग्णालयात कुठेही लाईट नसल्यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत.
शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरण कडून शटडाऊन घेतले जाते. या काळात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. पण या शटडाउनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं होत. या कामामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले त्यामुळे रुग्णालयाचा वीज पुरवठा तीन तास खंडित झाला होता.
पुढील तीन ते चार तास वीज पुरवठा होत नसल्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वार्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. सुदैवानं आयसीयूमध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयूमधील मशिनरी सुरू आहेत. मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसुती लाईट नसल्यामुळे सर्व काही ठप्प झालं आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जेव्हा वीज पुरुवठा खंडित होतो तेव्हा रुग्णालयाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येते. मात्र इथे कोणतीही व्यवस्था नसल्याने सगळ्यांचे हाल होत आहेत. आणखी तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑपरेशन्स रखडल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule