Saturday, April 20, 2024

Latest Posts

Thane मध्ये पुन्हा वाद!, शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर भिडले?

नुकतीच ठाणे शहरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाले आहेत.

नुकतीच ठाणे शहरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाले आहेत. ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटात म्हणजेच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात राडा झाला आहे. या वादात शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद हे दिवसेंदिवस वाढत आहेत. परंतु आजचा हा वाद विकोपाला गेले असून हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात गेले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी दोन्ही गटाने केली आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही गटात वाद झाला होता. तो वाद शांत होत नाही तोपर्यंत पुन्हा नवीन वाद झाला आहे.

ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर कामगारांना घरे मिळावी, यासाठी प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनीही कार्यकर्त्यांसह कंपनीमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. आपण दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्यानुसार स्थानिकांना कामे मिळालेली असल्याचा दावा त्यांनी केला होता.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप बारटक्के यांच्या गटात हा वाद झाला आहे. या वादामुळे शिंदे गटामधील गटबाजीचे दर्शन पुन्हा झाले आहे. वर्तक नगर येथील कन्स्ट्रक्शन साईडवरील काम मिळण्यावरून प्रताप सरनाईक गट आणि दिलीप बारटक्के गट एकमेकांसमोर आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांच्या माणसांनी ट्रक तोडल्याचा बारटक्के गटाकडून आरोप केला आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून न्याय देण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss