यूट्यूबवर (YouTube) काही व्हिडिओ पाहून एटीएम मशीनची स्ट्रीप, स्क्रू ड्रायव्हर, पट्टी अशा विविध साहित्याने छेडछाड करत एटीएममधून पैसे काढणाऱ्या एका चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुनील शर्मा असं या चोराचं नाव असून अशी आणखी बऱ्याच चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना त्याच्यावर आहे. यासंबंधित पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. कल्याणमधील सहजानंद चौक परिसरातील एका बँकेच्या एटीएम मशीन सोबत छेडछाड करत एटीएममधून पैसे चोरी केल्याची घटना घडली व ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यासंबंधित बँकेच्या मॅनेजर ने कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करताच कल्याण झोन ३ चे डीसीपी(DCP) सचिन गुंजाळ, एसीपी(ACP) कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, एपीआय (API) रूपवते आणि पीएसआय (PSI) मोरे यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या इतर स्टाफने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला होता.
या आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?
या चोरट्याला पोलिसांची भनक लागताच हा आरोपी उत्तर प्रदेशला पळून गेला होता, मात्र त्याच्याकडचे पैसे संपल्याने तो पुन्हा कल्याणमधील रेतीबंदर येथील त्याच्या राहत्या घरी परत आला. पण पोलिसांनी आधीच त्याच्या घरावर नजर ठेवली होती. जसा तो या कल्याण परिसरात आला तसाच पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुनील वर्मा याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर काही धक्कादाय गोष्टी त्याच्याकडून समोर आल्या त्या गोष्टी म्हणजे की एटीएम मशीनमधून चोरीने पैसे काढणं तो यूट्यूबवरील काही व्हिडिओ पाहून शिकला होता. हे शिकल्यानंतर तो एटीएममध्ये जाऊन चोऱ्या करायचा. पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी एक सराईत चोर असून स्वतःचा मौजमस्तीसाठी तो अश्या चोऱ्या करायचा, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून यापुढील प्रकरणाचा शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा :
१५-२० लाखांचं बजेट आहे? तर ‘या’ कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन
शाहरुख खानचा ‘डंकी’चा टीझर प्रदर्शित,नव्या लुकची चर्चा