Thursday, April 25, 2024

Latest Posts

धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबांचा ३ दिवसीय दरबार अंबरनाथमध्ये

तीन दिवस अंबरनाथमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार भरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांना नोटीस बजावली आहे.

तीन दिवस अंबरनाथमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार भरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अपमान होणार नाही, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, चमत्कारांचे दावे होणार नाहीत, दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही तसेच अंधश्रद्धा प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून भाविकांची दिशाभूल करून समाजामध्ये अंधश्रद्धेचा प्रसार होईल असे कृत्य होणार नाही याची गांभिर्यापूर्वक दक्षात घ्यावी,त्याचबरोबर समाजात अंधश्रद्धेचा प्रसार कोणत्याही मार्गाने झाला नाही पाहिजे ह्या सर्व गोष्टींची काळजी घेण्याचे आदेशच पोलिसांनी बागेश्वर बाबांना या नोटीशीमधून देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी नोटिशीद्वारे दिला आहे.

दिनांक ७ मे ते ९ मे या कालावधीत अंबरनाख पूर्वेला असलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात, शिवमंदिराजवळ अंबरनाथच्या श्री बागेश्वर धाम सरकार उत्सव समितीतर्फे हनुमान कथा आण दिव्य दर्शन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला ७० हजारांहून अधिक जनसमुदाय येणार असल्याची माहिती मिळत आहे.पोलिसांना बागेश्वर बाबांना बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, यापूर्वीच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरविल्या गेल्या होत्या , त्या आधारे समाजाचे विविध मार्गांनी आर्थिक व मानसिक शोषण करणे, चमत्काराचा दावा करून लोकांची दिशाभूल व फसवणूक केली जाणे, तसेच आपल्याकडून महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि महापुरुषांचा अवमान झाल्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेड यांनी यापूर्वी आपल्या कार्यक्रमांना विरोध दर्शवलेला आहे.ही पार्श्वभूमी पाहता श्री धीरेंद्र कृष्णा शास्त्री महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांच्याकडून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अवमान होणा नाही, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत किंवा वैयक्तिक भावना दुखावतील असे भाष्य, वक्तव्य, घोषणा, हावभाव, चमत्काराचे दावे आपल्याकडून व जनसमुदायातील नागरिकांकडून होणा नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या बरोबरच महाराजांच्या चिथावणीवरून आपल्या हस्तकांकडून दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन जनतेच्या जीवितास, मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य तसेच अंधश्रद्धा प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून भाविकांची दिशाभूल करून समाजामध्ये अंधश्रद्धेचा प्रसार होईल असे कृत्य होणार नाही याची गांभिर्यापूर्वक दक्षात घ्यावी, असे ही पोलिसांनी म्हटले आहे.या कार्यक्रमामुळे कोणताही अनुचित प्रकार झाल्यास व त्यामुळे सार्वजनिक शांतताभंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी बजावले आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठी बांधवानी एकजुटीने मतदान करा, राज ठाकरेचे आवाहन

Karnataka Assembly Elections, राहुल गांधींनी कामगारांशी साधला संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss