spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

भिवंडीतील Taware Stadium ची दुरावस्था; महापालिकेचे दुर्लक्ष, क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी

भिवंडी महापालिकेने या स्टेडियमवर दुर्लक्ष करत स्टेडियम मीना बाजार व फूड फेस्टिवल साठी भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे.

भिवंडी शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक व खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्व.परशुराम धोंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे टावरे स्टेडियमला अवकळा आली आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरावस्थेकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी युनिक स्पोर्ट्स क्लबचे अबूझर खान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी भिवंडी तालुका क्रिकेट असोसीएशनचे अध्यक्ष हुसेन सरगुरु यासोबत स्थानिक रियल स्पोर्ट क्लब, मोमीन स्पोर्ट्स क्लब, अंजुमन स्पोर्ट्स क्लब, व्ही चॅलेंजर्स क्लब, स्टार वॉर क्लब, युनिक स्पोर्ट्स क्लब चे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते.

भिवंडी शहराच्या मध्यभागी धोबी तलाव अस्तित्वात होता. त्या तलावात भराव टाकून तत्कालीन नगरपालिकेने 1995 मध्ये या ठिकाणी भव्य प्रेक्षक गॅलरी सह क्रीडांगण बनवले.परंतु या क्रीडांगणाच्या निगा व दुरुस्ती कडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे या क्रीडांगणाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. कधीकाळी या क्रीडांगणावर सीझन बॉल क्रिकेट टूर्नामेंट भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे हुसेन सरगुरु यांच्या नेतृत्वा खाली होत असत परंतु 2018 पासून या क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेट असेल तसेच वेळे जत्रा आयोजित करण्यासाठी महापालिकेने भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून या क्रीडांगणाकडे पालिकेचे दुर्लक्ष सुरू झाले आणि त्यामुळे सध्या या क्रीडांगणावर बेशिस्त कारभार सुरु आहे. दोन हजार रुपये नाममात्र भाड्यावर घेत फूड फेस्टिवल, आनंद मेला असे कार्यक्रम आयोजित करून बक्कळ पैसे आयोजक कमावतात पण कार्यक्रम करून गेल्यानंतर तेथील कचरा सुद्धा उचलण्याचे सौजन्य कार्यक्रम आयोजन करणारे करत नाही हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया अँड रशीद रफिक यांनी दिली आहे.

भिवंडी महापालिकेने या स्टेडियमवर दुर्लक्ष करत स्टेडियम मीना बाजार व फूड फेस्टिवल साठी भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. मीना बाजार व फूड फेस्टिवलमुळे स्टेडियमवर खोदकाम व कचरा साचल्याने स्टेडियमला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. स्टेडियममधील पत्रे तुटले असून स्टेडियममधील माती खोडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले असून सध्या हे स्टेडियम गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असल्याने स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेट व गुटख्याच्या पाकिटांचा खच पडला आहे. त्यातच नुकताच या स्टेडियममध्ये भरलेल्या फूड फेस्टिवलमुळे ग्राऊंडमध्ये चक्क चुली पेटविण्यात आल्या होत्या. ज्याची राख आजही स्टेडियमवर तशीच असल्याने क्रिकेट क्लब प्रतिनिधींनी मनपाच्या या दुर्लक्षित कारभाराचा जाहीर निषेध केला.

हे ही वाचा : 

Saif Ali Khan Attacked : अभिनेता सैफ अली खानवर अज्ञाताकडून घरात घुसून चाकू हल्ला; लिलावती रुग्णालयात उपचार सुरू

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss