spot_img
spot_img

Latest Posts

मागठाण्यातील कार्यक्रमात गौतमी पाटीलचा नृत्याविष्कार

आज संपूर्ण राज्यभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी मोठ्या कायर्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

आज संपूर्ण राज्यभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी मोठ्या कायर्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी नेत्याच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवाला अनेक दिग्ज नेत्यांना , सेलिब्रिटींना या कार्यक्रमात बोलवण्यात आले आहे. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला बोलवण्यात आले आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी आलेलं तिचा नाव गाणं ‘ सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…’ , या गाण्यावर लावणी नृत्य केल आहे.

गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या लावणीची अनेकांना भुरळ पडली आहे. त्याच्या बोल्ड लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा लावणी डान्स अनेकांना खूप आवडतो. गौतमी पाटीलची एक झलक दिसावी म्हणून सगळेच उत्सुक असतात. अशातच आज तिने ठाण्यामधील मागठाण्यात दहीहंडी उत्सवातील कार्यक्रमाला हजेरी लावली. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणावर मागठाण्यात गर्दी केली आहे. यावेळी या कार्यक्रमात गौतमीने सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर डान्स केला आहे. तर काही प्रेक्षकांनी तिच्यासोबत या गाण्यावर डान्स देखील केला.

दहीहंडी कार्यक्रमात पाव्हणं जेवला का? या गाण्यावर गौतमीने जबरदस्त डान्स केला आहे. या कार्यक्रमात गौतमीला तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागठाण्यातील या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तरुणांनी शिट्या आणि टाळया वाजवून तिच्या डान्सला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी तरुणाई मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पाहायला मिळाली. ‘ मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटत आहे. कार्यक्रमानिमित्त बऱ्याच ठिकाणी जाते पण तसाच इथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईत सुरक्षित वाटलं. इतर ठिकाणीही मी सुरक्षित आहे. पण मुंबईकरांचं आजचं प्रेम बघून मी भारावून गेली आहे’ , असं गौतमी पाटील म्हणाली.

Latest Posts

Don't Miss