spot_img
spot_img
Thursday, September 21, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी

गणेशोत्सवाची लगबग आता सुरु झाली आहे. दरवर्षी कोकणात मोठ्या संख्येने भाविक गणपतीसाठी जातात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचे आगमन केले जाते.

(Ganeshostav 2023) .गणेशोत्सवाची लगबग आता सुरु झाली आहे. दरवर्षी कोकणात मोठ्या संख्येने भाविक गणपतीसाठी जातात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचे आगमन केले जाते. कोकणात गावाला जाताना काहीजण रेल्वेने किंवा एसटीने प्रवास करतात. यावेळी भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. तर आता कोकणात आणि कोल्हापूरला जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. .गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. त्यामुळे आता खाजगी बस ट्रॅव्हलने किती दर अकरावेत याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या बस दरामुळे प्रवाशांची होणारी लूटमार बंद होणार आहे.

कोकणात गावाला जाताना अनेकजण सुट्टीचे नियोजन आधीच करून ठेवतात. रेल्वे आणि एसटीचे तिकीट सहा महिने आधीच काढून ठेवतात. पण काहीवेळा ऐनवेळी गावाला जायचे नियोजन केल्यामुळे प्रवाशाना जास्तीचे पैसे देऊन गावी जावे लागते. अश्यावेळी खाजगी बस ट्रॅव्हल प्रवासांकडून जास्तीचे पैसे घेतात. अशावेळी प्रवाशानाची होणारी लूटमार थांबण्यासाठी नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. खाजगी बस ट्रॅव्हलने किती पैसे आकरावेत यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळत नसले त्याच्यासाठी शिंदे गटाकडून व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकणातील चाकरमानी खुश होणार आहेत.

गणपतीसाठी खाजगी ट्रॅव्हलने प्रवास करताना आकारण्यात येणाऱ्या दरांची यादी
वाशी ते महाड ४२८रु , वाशी ते खेड ५७८रु , वाशी ते चिपळूण ६२३रु , वाशी ते दापोली ५३३रु , वाशी ते श्रीवर्धन ४२८रु, वाशी ते संगमेश्वर ७२८रु, वाशी ते लांजा ८९३रु, वाशी ते राजापूर ९५३रु, वाशी ते रत्नागिरी ८४८रु, वाशी ते देवगड – ११८५ रु, वाशी ते गणपतीपुळे –९७५ रु, वाशी ते कणकवली – १११० रु, वाशी ते कुडाळ – ११८५ रु, वाशी ते सावंतवाडी – १२६० रु, वाशी ते मालवण – १२१५ रु, वाशी ते जयगड – ९५३ रु, वाशी ते विजयदुर्ग – १२००रु, वाशी ते मलकापूर –९०८ रु, वाशी ते पाचल – ९९०रु, वाशी ते गगनबावडा –११०रु, वाशी ते साखरपा – ८१८रु या स्वरूपात दार आकारण्यात येणार आहेत.

हे ही वाचा: 

येरवडा कारागृहात आरोपीने केली आत्महत्या

ठाकरे गटाला पुन्हा धक्का उपनेते बबनराव घोलप यांनी दिला राजीनामा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss