राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. काल प्रचार संपला आहे. उद्या मतदान होणार आहे. असं असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठाने आरोप केला आहे. तसेच नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीने भाजपवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले आहे. पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला आहे. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह नालासोपारा येथील भाजप उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये घेरले. त्यावेळी दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा प्रकार झाला आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा झाला आहे.
वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे” असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. “भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. “माझं फोन बुक बघा. किती इनकमिंग कॉल आहेत त्यांचे. मला अगोदर न्यूज आलेली, विनोद तावडे पाच कोटी घेऊन येणार. डायऱ्या मिळाल्या आहेत, काय कायदेशीर कारवाई होते बघू” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. “विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. ४८ तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. “त्यांनी मला २५ फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं” असं विनोद तावडे म्हणाल्याच हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला.
हे ही वाचा:
लोकांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले, आम्ही काम करतो म्हणून ते…| Avinash Jadhav | MNS | Thane