spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

ठाण्यात हायपरसिटी मॉलला (Hyper City Mall Fire)आग; दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ठाण्यातील कासारवडवली भागात असलेल्या हायपर सिटी मॉलला आज सकाळी भीषण आग लागली आहे. साधारणपणे सकाळी ७:५० च्या सुमारास ही आग लागली आहे. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर Puma Brand आऊटलेट ला ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीविषयीची माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे.

या आगीची तीव्रता खूप जास्त होती. मात्र, सकाळची वेळ असल्यामुळे ग्राहकांची गर्दी नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आजुबाजूच्या दुकानांनादेखील आग लागली आहे. आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. ही आग इतकी भीषण होती की खूप दूरवरुन आगीचे आणि धुराचे लोट दिसत होते. दुसऱ्या मजल्यावर काही कपड्यांची दुकाने होती. या दुकानांमधलं सामान जळून खाक झालं आहे. Puma शोरुममध्ये ही आग लागल्याचं सांगण्यात आलं आहे.

घटनास्थळी कासारवडवली पोलीस स्टेशनमधील अधिकारी, अग्नीशमन दलाचे कर्मचारी पोहोचले आहेत. आगीचे दोन बंब मॉलजवळ आणण्यात आले आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीत जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.आगीचे कारण शोधण्यासाठी कुलिंग ऑपेरेशन सुरु आहे.तसेच चौकशी चालू आहे. या आगीचे काही (Hyper City Mall Fire Video) व्हिडिओ आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही आग Level २ ची असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss