महविकास आघाडीमध्ये झालेल्या पराभवानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होताना दिसत आहेत. महायुतीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता युती मध्ये कोण कोण सामील होणार याबाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता, तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच विधानसभेला युती झाली नाही. असे म्हणण्यात आले आहे. तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक पार पडली. याच पार्शवभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ संदर्भात बोलत असताना अविनाश जाधव म्हणाले आहेत की, विधानसभेला आम्ही एकटे लढलो तीन-तीन पक्ष एकत्र आमच्या विरोधात लढले. ३०, ४०, ७० हजार मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेला झालेल्या आहेत. हे झालेला मतदान आमच्या एकट्याचं आहे तीन-तीन पक्ष मिळून झालेलं नाही. प्रभागात आणि वार्डात आमची जी काही ताकद आहे ती दिसून आली आहे. महानगरपालिका निवडणुकीला कसं सामोरे जायचे याचा कानमंत्र राज ठाकरे देतील. तसेच पुढे मनसे-भाजप युती संदर्भात बोलत असताना अविनाश जाधव म्हणाले आहेत की, मनसे आणि भाजपा युती झाली तर आम्ही त्याचे स्वागतच करूच. मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असे वाटलं होते पण काही कारणास्तव ते झाले नाही. भविष्यात आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. विधानसभेत अनेक ठिकाणी पाहिले तर आम्ही एकटे लढल्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला सुद्धा झाला आहे.
तसेच अविनाश जाधव यांनी पुढे संजय राऊतांवर देखील हल्लबोल हा केला आहे. शिवसेना संपवण्याचे पाप संजय राऊत यांनी केले आहे. बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचे काम राऊतांनी केले आहे, त्यांनी मनसेचा विचार करु नये. आम्ही पुन्हा उभे राहू, बाळासाहेबांना पण पक्ष उभा करायला 37 वर्षे लागली होती. संजय राऊत शिवसेना पक्ष घेऊन डुबतील.
हे ही वाचा:
अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरी झाली चोरी, हिऱ्यांचा नेकलेस, -रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला केली अटक
HMPV Virus Cases : देशात HMPV विषाणूच्या रुग्णांमध्ये झाली वाढ, 30 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात…