spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

कल्याणमध्ये पालिका रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच महिलेने दिला बाळाला जन्म पोलिस,नागरिकांनी विनवणी करुनसुद्धा…

कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकवर राहत असलेल्या एक फिरस्ता गरोदर महिलेला शनिवारी रात्री प्रसूती (childbirth) वेदना सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकवर राहत असलेल्या एक फिरस्ता गरोदर महिलेला शनिवारी रात्री प्रसूती (childbirth) वेदना सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या महिलेला कल्याण डोंबिवली पालिकेच्या (Kalyan Dombivli Municipality) रुक्मिणीबाई रुग्णालयात (Rukminibai Hospital) नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने ‘येथे कर्मचारी नाही. तुम्ही दुसरीकडे घेऊन जा, अशी दुरुत्तरे दिली. दाखल करुन घेण्याच्या विषयावरुन पोलीस, रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये बोलाचाली सुरू असतानाच, संबंधित महिलेची रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात प्रसूती झाली.

रुग्णालय प्रशासनाने महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करुन घेतले असते तर तिच्यावर प्रवेशव्दारात प्रसूती होण्याची वेळ आली नसती. पोलीस या महिलेला तातडीने दाखल करुन घ्या. तिच्या प्रसूती वेदना वाढल्या आहेत, अशी विनवणी करुन रुग्णालय कर्मचाऱ्यांना सांगत होते. कर्मचारी आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अशी उत्तरे देऊन दाराशी आलेल्या महिलेला दाखल करुन घेण्यास नकार देत होते. तिच्याकडे लक्ष देत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे पालिकेच्या रुग्णालय प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत काही राजकीय मंडळींनी रुग्णालयात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोलीस पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क साधत होते, पण कोणीही संपर्कात नसल्याचे पोलिसांना आढळले. पालिकेतील बहुतांशी अधिकारी वर्ग शासकीय सेवेतील आणि पुणे, ठाणे, नवी मुंबई भागात राहणार आहे. ही मंडळी गंभीर परिस्थितीच्या वेळी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी विनंती करुनही रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूती वेदना होत नसलेल्या महिलेला दाखल करुन घेतले जात नसेल तर, इतर सामान्य कुटुंबातील दाखल होण्यासाठी येणाऱ्या महिलांची काय अवस्था होत असेल, असे प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. पालिकेच्या शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयात सिझरिन, प्रसूृती वेदना होत असलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही. त्यांना कळवा येथील छत्रपती रुग्णालयात किंवा रुग्णालयातील डाॅक्टर सांगेल त्या रुग्णालयात जाण्यास सांगितले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधित महिलेला पालिकेच्या वसंत व्हॅली येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात रुग्णवाहिकेची सोय केली होती. परंतु या महिलेला रुग्णवाहिकेत ठेवण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिले.

“रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथे स्थलांतरित केला आहे. या महिलेला तेथे जाण्याची सूचना कर्मचारी करत होते. त्यावेळेत महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती झाली. तिला डाॅक्टर, परिचारिकांनी तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले. आई, बाळ सुखरूप आहेत. तरीही ही घटना का घडली या प्रकराची चौकशी केली जाईल. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार केले जातात.” -डाॅ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

Latest Posts

Don't Miss