spot_img
spot_img

Latest Posts

वाशीत नवी मुंबई आघाडीतर्फे जालना येथील घटनेचे निषेध आंदोलन…

गेल्या आठवड्यापासून जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचे आरक्षण (maratha community reservation) मागणीसाठी आंदोलन (Protest) सुरू आहे.

गेल्या आठवड्यापासून जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarvali Sarati) गावात मराठा समाजाचे आरक्षण (maratha community reservation) मागणीसाठी आंदोलन (Protest) सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनास हिंसक वळण लागले त्यावेळी पोलिसांनी (police) लाठीचार्ज केला. त्याचा निषेध करण्यासाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई (Navi Mumbai) आघाडी तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena leader Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा अध्यादेश निघेपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. याला चार दिवसांनी मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान जरांगे यांना काही झाले तर शिंदे सरकारला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक संदीप सुतार (Sandeep Sutar), विक्रम शिंदे (Vikram Shinde), विठ्ठल मोरे (Vithal More), माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर (Dilip Ghodekar), शाखा प्रमुख समीर बागवान (Sameer Bagwan), काँग्रेस प्रवक्ता नासिर हुसेन (Nasir Hussain) तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), अतुल सावे (Atul Save) यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्विकारली. मात्र, जरांगे मागे हटले नाही.

हे ही वाचा: 

Janmashtami 2023, श्रीकृष्णाची भुमिका साकारुन ‘हे’ कलाकार झाले लोकप्रिय…

G-20 निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतने केले ट्वीट, म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss