spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

KALYAN CRIME: सामान उधार न दिल्याने केली मारहाण

दुकानात सुरु असलेला वाद ऐकून तिची मुलगी आणि दीर काय झालं हे पाहायला आले. आणि त्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी दुकानातील तिघांनाही मारहाण करण्यास सुरवात केली.

एकीकडे मराठा आरक्षणाच्या (MARATHA RESERVATION) मुद्द्यावरून महाराष्ट्र संतापला आहे. तर दुसरीकडे दादागिरी, मारामारी आणि चोरी यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशीच एक दादागिरीची घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील (THANE DISTRICT) कल्याणमध्ये (KALYAN) अडवली ढोकळी परिसरात मोदी किराणा व जनरल स्टोअर आहे. किराणा दुकानातील माल उधार देण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेवून दुकानाची तोडफोड करण्याची घटना कल्याणमध्ये घडली. या घटनेत तरुणाने दुकान चालकांना बेदम मारहाण करत दुकानाचे तोडफोड केली. याशिवाय, त्या ठिकाणी दगडफेक सुद्धा करण्यात आली. या संदर्भात मानपाडा पोलिसांनी  (MANPADA POLICE STATION) गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

अडवली ढोकळीतील मोदी किराणा दुकानात गौतम अर्थात भोला सिंग, अभिषेक गुप्ता, गोलू व आशु हे चार तरुण दुकानात किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. सामान घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी सामान उधार देण्याची मागणी केली. यावेळी दुकानात असेल्या महिला कुसुम सिंग यांनी सामान उधार देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन तरुणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानात सुरु असलेला वाद ऐकून तिची मुलगी आणि दीर काय झालं हे पाहायला आले. आणि त्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी दुकानातील तिघांनाही मारहाण करण्यास सुरवात केली.

याशिवाय त्या तरुणांनी दुकानावर दगडफेक करून दुकान फोडले. महिला व तिच्या मुली आणि दिरावर तरुणांनी दगडफेक केली. हि सर्व घटना जवळ-जवळ अर्धा तास सुरु होती. अर्ध्या तासानंतर जीव वाचवत या महिलांनी मानपाडा पोलिस स्थानकात घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपस सुरु केला असून तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. तरुण आरोपींच्या दगडफेकीच्या हल्ल्यात दुकानदार अर्थात तक्रारदार जखमी झाले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा सामान उधार न दिल्याने आरोपींची दुकानावर हल्ला केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत, अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : 

MARATHA RESERVATION : आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल, शांततेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु

आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर, २०२३, इतरांना दुखावू नका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss