spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Kalyan Dombivli Crime News : कल्याण ते दादर येथे धावणाऱ्या ट्रेन मध्ये भरगर्दीत चाकू हल्ला

Kalyan Dombivli Crime News : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन (Local Train) मध्ये भरगर्दीत सकाळच्या वेळी चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. १९ वर्षीय इसम शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला.

Kalyan Dombivli Crime News : मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन (Local Train) मध्ये भरगर्दीत सकाळच्या वेळी चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. १९ वर्षीय इसम शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला. गर्दीत सकाळच्या वेळी धक्का लागण्यावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एकच खळबळ उडाली.

मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया, राजेश अशोक चांगलानी या तीन प्रवशांनी कल्याण ते दादर ही सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी फास्ट लोकल ट्रेन कल्याण स्टेशनवरून पकडली होती. त्याच ट्रेनमध्ये आरोपी इसम शेख जिया हुसेन, वय १९ वर्षे, राहणार मुंब्रा, हा देखील त्याच कल्याण ट्रेनमध्ये चढलेला होता. तो मुंब्रा येथे उतरण्यासाठी कल्याणवरुनच चढला होता. यावेळी लोकल मध्ये प्रवाशांनी त्या आरोपीला कल्याणवरुन निघालेली ही लोकल फास्ट ट्रेन आहे आणि ती मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही.असे सांगितले. प्रवाशांच्या या माहितीनंतर आरोपीने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीला सहप्रवासी लोकांकडून धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये आरोपीला त्या लोकांनी मारहाण केली.

आरोपीला सहप्रवाशांनी मारहाण केल्यानंतर आरोपीने थेट खिशातील चाकू काढून त्या सहप्रवाशांवर चाकू हल्ला करत त्यांना मारहाण केली. या चाकू हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. प्रवाशांनी त्या आरोपीला ताब्यात घेऊन आरपीएफला कळवलं. आरपीएफ (RPF) अंमलदार यांनी आरोपीला ठाणे रेल्वे स्टेशन इथे हजर केलं. त्यानंतर प्रवाशांवर औषध उपचार करून तक्रार देण्याकरता सदरील तक्रारदार डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन इथे आले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.या सर्व घटनेमुळे ट्रेन मध्ये होणाऱ्या चोरी, बलात्कार, चाकू हल्ले यामुळे लोकलने प्रवास करणे भीतीचे ठरत आहे. यासंदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई करत. योग्य ते निर्बंध लावण्यात यावे अशी प्रवाशांकडून मागणी करण्यात येत आहे.

Class 10th Board Exam: दहावीच्या परीक्षेसाठी ७०१ केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांची बदली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss