Tuesday, November 28, 2023

Latest Posts

KALYAN: पाणीपुरवठा राहणार बंद

कल्याण परिसरातील गावांमधील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी जपून पाणी वापरावे, तसेच पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

ठाणे (Thane District) जिल्ह्यात मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारे धरण असूनही ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या भेडसावत असतात. ठाणे जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) आणि डोंबिवली (Dombivali) परिसरात अनेकदा पाणी पुरवठा बंद करण्यात येत असतो. कल्याण तालुक्यात असणाऱ्या बऱ्याचशा गावांमध्ये शुक्रवारी (Friday) पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येते तर काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. त्यामुळे प्रत्येक आठवड्यात नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कल्याण आणि डोंबिवलीच्या महापालिकेच्या बारावे तसेच मोहिली जल शुद्धीकरण केंद्रातून होणार पाणी पुरवठा मंगळवारी (Tuesday) बंद राहणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (Kalyan-Dombivali Municipal Corporation) १४४ दशलक्षलीटर क्षमतेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्र व १०० दशलक्षलीटर क्षमतेच्या मोहिली जल शुद्धीकरण केंद्राच्या विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्तीची कामे मंगळवारी करण्यात येणार आहेत. म्हणूनच, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या भागात पाणी येणार नाही. बारावे, मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण विभागातील टिटवाळा (Titwala), वडवली, आंबिवली (Ambivali), शहाड (Shahad), अटाळी तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये केला जाणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. कल्याण परिसरातील गावांमधील पाणी पुरवठा (Water Supply) बंद राहणार असल्याने नागरिकांनी जपून पाणी वापरावे, तसेच पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

नशेत कार चालवणं महिलेला पडलं महागात? तीन जणांना…

वाढत्या वयाबरोबर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, रहाल निरोगी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss