रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील वृंदावन रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेला हा रुग्णालयीन कचरा रस्त्यावर टाकू नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. अन्यथा संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील केडीएमसी (KDMC) ने दिला आहे.
रुग्णालयीन घनकचरा नागरी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असून, या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे बंधनकारक असतानाही अनेक डॉक्टर रुग्णालयात वापरलेली इंजेक्शन, सीरिंज कचऱ्यात फेकतात. कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील वृंदावन रुग्णालयाकडून रुग्णालयात वापरले जाणारे इंजेक्शन, आयव्ही बॉटल, काढलेले प्लास्टर, कापूस, बँडेज, वापरलेल्या आणि न वापरलेल्या सीरिंज असा कचरा रस्त्यावर टाकल्याचे आढळून आले होते. या प्रकरणीकेडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी वृंदावन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्णालयाने त्यांचा रुग्णालयीन कचरा हा रस्त्यावर टाकू नये असे आवाहन केडीएमसी (KDMC) कडून करण्यात आले आहे. नियमाचा भंग करत रुग्णालयीन कचरा बाहेर फेकणाऱ्या रुग्णालय विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील उपायुक्त पाटील यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
‘संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे’ Sanjay Raut यांची आक्रमक भूमिका
Follow Us