spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

ठाण्यात कोकण ग्रामविकास मंडळाच्या मालवणी महोत्सवाचा शुभारंभ

ठाणेकरांनी गेली २६ वर्षे उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवय्यांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे. तरी, १० दिवस नागरीकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे. असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले.

ठाणेकरांनी गेली २६ वर्षे उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवय्यांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे. तरी, १० दिवस नागरीकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे. असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले.

https://youtu.be/_iaThInuVZQ?si=Cn7xd8iGkFxNoB7Y

कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे १० ते १९ जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता.१० जाने.) रोजी सायंकाळी सुर्यास्ताच्या मुहुर्तावर अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्याहस्ते या मालवणी महोत्सव २०२५ चे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन सदस्य विकास पाटील, विरसिंह परछा, सागर भदे ,संतोष साळुंखे, विनोद देसाई, अनिल मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खांदेशी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी, कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कलासंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतुने गेली २६ वर्षे सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवतात. ठाणेकरांनी उचलून धरलेला हा मालवणी महोत्सव आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खवय्यांसाठी दहा दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. तेव्हा, खवय्यांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागवणारा हा महोत्सव असल्याचे सांगितले.

तर, निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसाने या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातुन कोकणचे नाते शहरवासियांशी जोडून ठेवले आहे. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुकोद्गार काढले.

ठाणेकर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात, शेतीपुरक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा उत्सव आहे. या ठिकाणीं कोकणी खाद्यपदार्थांसह आगरी, कोळी, खांदेशी अशा सर्वच प्रकारच्या वेगवेगळ्या चवींच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थाची चव चाखता येणार आहे. त्यामूळे ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss