spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड परिसरात प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड परिसरात महानगरपालिकेच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरत स्वाक्षरी मोहीम आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यांची प्रमुख मागणी आहे की हा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवावा.

कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड परिसरात महानगरपालिकेच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरत स्वाक्षरी मोहीम आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यांची प्रमुख मागणी आहे की हा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवावा.

कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड परिसरात महानगरपालिका घनकचरा प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. तथापि, स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मते, हा प्रकल्प मानवी वस्त्यांच्या जवळ असल्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आंदोलनाच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो रहिवाशांनी एकत्र येऊन स्वाक्षरी मोहीम राबवली आणि घोषणाबाजी केली. स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या आधी पालिका अधिकारी सोबत बैठक झाली. या बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे आयुक्त इंदुराणी जाखड आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अतुल पाटील यांनी प्रकल्पाचे फायदे स्पष्ट केले होते.

मात्र, या वेळी रहिवाशांनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या प्रकल्पामुळे सर्वांना जवळपास शेकडो कुटुंबांना याचा नाहक त्रास होणार असल्याने हा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवण्याची मागणी केली. मात्र, गडकिल्यावर ही कचरा असतो मग आपल्याला या प्रकल्पाला विरोध का प्रकल्पाच्या फायद्यांवर भर देत प्रकल्प याच ठिकाणी उभारण्याचे मत स्पष्ट केले. मात्र, पालिकेच्या या भूमिकेनंतर रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाले असून आता या रहिवाशांनी आंदोलन सुरू केले. याची सुरुवातीला कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे रहिवाशांनी रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम राबवत पालिकेच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या रहिवाशांनी यावेळेस केला आहे.

हे ही वाचा : 

एकापाठोपाठ एक विरोधकांचे व्हिडीओ बाहेर, धसांनंतर आता Sandeep Kshirsagarअडचणीत नेमकं यामागे कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss