बहिणीसाठी औषध आणायला गेलेला मुलगा तिथूनच फळ घ्यायला गेला असताना त्याला फळ १०० रुपये किलो सांगण्यात आली. तो मुलगा म्हणाला ५० ला फळ देणार का? फळविक्रेता हिंदीत बोलत असल्यामुळे तो मुलगा म्हणाला “मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो.” त्यातून हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे.
मुंब्र्यात एका मराठी माणसासोबत दादागिरीची घटना घडली आहे. एका युवकाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितल्या वरून वादाची ठिणगी पेटली. फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? म्हणून विचारलं, त्यावरून जमावाने तरुणाला अपशब्दात बोलून त्याला माफी मागायला लावली. आज विशाल गवळी या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या कार्यालयाला भेट घेत त्यांना सर्व घडलेली घटना सांगितली. मनसेचे नेते अविनाश जाधव थेट अॅक्शन घेत मुंब्र्यात घुसण्याचा इशारा दिला आहे. मागच्या काही दिवसापासून मराठी माणसाबाबत अपमानास्पद गोष्टी घडण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच अजून एका घटनेला मुंब्र्यात उजाळा मिळाला आहे. मुंब्र्यातील कालची घटना ही खरंच वाईट आहे. तो मुलगा बहिणीसाठी औषध आणायला गेला असताना त्याच ठिकाणाहून तो फळ घ्यायला गेला. फळ घेताना १०० रुपये किलो सांगितली. तो मुलगा ५० ला देणार का? असं विचारताच फळवाला हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोला महाराष्ट्रात राहतो. त्यातूनच वाद विकोपाला गेला. असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
त्यानंतर तिथे असलेल्या मुस्लिम मुलांना समजलं. जवळपास १००-१५० चा जमाव जमलं. मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,” महाराष्ट्रात मराठीत बोलणार नाही बोलण्याची यांची एवढी हिम्मत कशी होते? आणि त्या फळवाल्यानेच व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल केला. असच जर महाराष्ट्रात घडत राहील तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि हे अस्तित्व विकोपाला जाईल. ठाणे, विरार आणि मुंबईतील जैन माणसाची घटना या सगळ्या घटना पाहील्या, तर सत्ता परिवर्तनानंतर हिम्मत वाढत चालली आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.
हे ही वाचा:
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करणार का ?
भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! सिडनी कसोटीपूर्वी गोलंदाज जखमी तर संघात कोणाला मिळणार जागा ?