महाराष्ट्र विधानसभेचा निकाल शनिवारी २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात दणदणीत विजय मिळवला. तब्बल २३६ जागा महायुतीने जिंकल्या तर केवळ ४९ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला बहुमत मिळालं. तर अपक्ष आणि इतर असे मिळून तिघांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे कोणते आमदार निवडून आले आहेत, ते पाहूया.
ठाणे विधानसभेच्या १८ मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांची नावे पुढीलप्रमाणे:
१३४ भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे (शिवसेना)
१३५ शहापूर – दौलत दरोडा (एनसीपी)
१३६ भिवंडी पश्चिम – महेश चौगुले (भाजप)
१३७ भिवंडी पूर्व – रईस पाटील (समाजवादी पार्टी)
१३८ कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर (शिवसेना)
१३९ मुरबाड – किसन कथोरे (भाजप)
१४० अंबरनाथ – बालाजी किणीकर (शिवसेना)
१४१ उल्हासनगर – कुमार आयलानी (भाजप)
१४२ कल्याण पूर्व – सुलभा गायकवाड (भाजप)
१४३ डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप)
१४४ कल्याण ग्रामीण – राजेश मोरे (शिवसेना)
१४५ मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजप)
१४६ ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक (शिवसेना)
१४७ कोपरी पाचपाखडी – एकनाथ शिंदे (शिवसेना)
१४८ ठाणे – संजय केळकर (भाजप)
१४९ मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (शरद पवार)
१५० ऐरोली – गणेश नाईक (भाजप)
१५१ बेलापूर – मंदा म्हात्रे (भाजप)
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”