डोंबिवलीत मानपाडा येथील तलाव सुशोभिकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांच्या कार्याची स्तुती केली. मात्र, या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमधील क्रीडा संकुल परिसरात पाहणी दरम्यान गटारीवरून उडी मारताना आमदार मोरे खड्यात पडले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळेच ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा येथे शिवसेनेच्या वतीने तलाव सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण खुद्द खासदार शिंदे यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “राजेश मोरे हे २४ तास कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहतात. मात्र, एका पाहणी दरम्यान उडी मारताना ते अपघातग्रस्त झाले आणि त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. त्यामुळेच ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, आमदार मोरे कसे पडले याची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाला अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण, शिक्षण, आरोग्य, धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प खासदार डॉ.श्रीकांत शिंदे त्यांच्यामुळे मार्गी लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ येथे विविध विकासप्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. याच विकास कामांचा पाहणी करून डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालिकेच्या सर्व विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या आणि सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या शिवमंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून ” शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प ” राबविण्यात येत आहे. याप्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार, संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार असून वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, प्रवेशद्वारसमोरील चौकात नंदी, संरक्षक भिंत, चेक डॅम भक्त निवास आणि भव्य घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील भव्य घाट उभारणीचे काम जलदगतीने सुरु आहे. यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी, वाराणसी प्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे. भक्तनिवासाचे काम सुरु झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पूर्ण होऊन या शहराचे रूप पालटणार आहे. अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या १ मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून लवकरच अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवता येणार आहे.
हे ही वाचा:
सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- CM Devendra Fadnavis
ठाकरेंच्या आमदार, खासदारांना आता स्नेहभोजनासाठी ‘आहार संहिता’, दिल्लीत आदित्य यांचा स्नेहमिलाप