Avinash Jadhav Exclusive Interview : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २००६ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःची एक वेगळी राजकीय चूल मांडली आणि याच दरम्यान एक तरुण ठाण्याच्या नाक्या नाक्यावर कॉलेजमध्ये कोंढाळ्यांमध्ये फिरत होता टेकडी बंगल्याच्या परिसरात लहानाचा मोठा झालेला आणि ठाण्याच्या अस्सल मातीमध्ये की ज्याचं युवा नेतृत्व उदयाला आलं त्याच्यावरती संस्कार झाले आणि जो राज ठाकरेंच्या तालमीत अगदी तावून सुलाकून ५२ खाणी सोन्यासारखा आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि बघता बघता टेकडी बंगल्यावरचा हा मुलगा विधानभवनाच्या दरवाज्यावर दस्तक देतो. याच अनुषंगाने टाईम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्याचे उमेदवार आणि आनंद दिघे यांच्या ठाण्यात स्वतःच्या राजकीय दस्तकीच आवाज देणारा तरुण म्हणजे अविनाश जाधव यांची थेट मुलाखत घेतली आहे.
प्रश्न – मुख्यमंत्र्यांचा ठाणे आनंदी त्यांचा ठाणे या ठाण्यातील टेकडी बंगल्यावरचा एका चाळीसळीत मंडळा मंडळांमध्ये वावरणारा एक छोटा मुलगा आज ज्यावेळी आनंद दिघेंच्या ठाण्यात शिवसेना प्रमुखांच्या ठाण्यात आमदारकीची निवडणूक लढवतो काय भावना आहेत? कधी वाटलं होतं का या शहरात आपण आमदारकीची निवडणूक लढवू? मागच्या वेळेस निवडणुकीत साडेआठ हजार मतांनी तुमचा पराभव झाला परंतु आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे. आणि अशातच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून विधानभवनाकडे निघण्याचं स्वप्न बघत आहात.
उत्तर – मी ध्येयवेढा आहे मी राज ठाकरे वेडा आहे मला असं वाटतं की त्यांनी मला घडवलं जे काही करता येतं ते मी करत असतो. माझ्या रक्तात राज ठाकरे आहेत त्यामुळे राज ठाकरे जे बोलतात ते मला करायचं असतं. हे सर्व करत असताना मी राज ठाकरे यांची भाषणे देखील ऐकतो आणि ते जे म्हणतात ते मी लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो . मी आधी काही सोसायटीमध्ये गेलो किंवा माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचं हे मी पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच माझा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे मी एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट करत असेल तर ही राज ठाकरे यांना आवडेल की नाही हा विचार करूनच मी पुढे निर्णय घेतो. राज ठाकरे यांच्या विचाराने मी पुढे चालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे आणि मला जे काही घडवलं आहे ते राज ठाकरे यांनी घडवला आहे.
प्रश्न – राज ठाकरे यांची व्यक्तिगत आयुष्यातील नक्कल करण्याचं धाडस हा कधी अविनाश जाधव यांनी केला नाही आणि तरी तो त्यांचा लाडका हे नेमक कसं?
उत्तर – राज ठाकरे हे महाराष्ट्र समोर एक वेगळा चेहरा आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला या माणसासारखं बनायचं. यांच्यासारखी स्टाईल करायची. पण मी नेहमी म्हणतो ते माझंही श्री राम आहेत. आणि मी त्यांचा हनुमंत आहे. त्यामुळे मी श्री राम यांच्यासारखा दिसून कास चालेल त्यामुळे मी हनुमंतसारखा वागण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रश्न – मनसेमधील काही युवा नेते किंवा कामगार नेते आहेत ते राज ठाकरे सारखे वागण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरेंची जशी लोक वाट बघतात तशी लोकांनी त्यांची वाट बघावी अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु असा फिल्मी पणा अविनाश जाधव यांनी केला नाही. परंतु त्याचवेळी आगाऊपणा करण्यामध्ये किंवा राज ठाकरे काही बोलले की त्याच्यावर लगेच ॲक्शन करण्याची त्यावर धावपळ धडपड करण्याची किंवा पक्षातून देखील दबक्या आवाजात टीका ही होत असते परंतु ही सर्व टीका बाजूला सारत ज्यावेळी अविनाश जाधव पुढे जातो तर त्या सर्व गोष्टींचा किती दबाव असतो आणि किती त्रास असतो?
उत्तर – माझं नेहमी असं म्हणत असतं की राज साहेब जे बोलतात ते खरं आहे. आतापर्यंत राज ठाकरेचे बोलले आणि त्यानुसार मी चेक केलं त्याचा फायदा हा थेट जनतेला झाला आहे लोकांमध्ये त्याचे जनजागृती झाली आहे. उदा – टोल नाक्यासारखी गोष्ट बंद करणे ही कोणाच्या लक्षात देखील नव्हतं परंतु १२ वर्षे वनवास करून आम्ही ही गोष्ट बंद केली पहिले ६७ आणि आता ५ मोठे टोल नाके बंद झाले आहेत.
प्रश्न – २००६ ला जेव्हा राज ठाकरे यांनी मनसेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा ते म्हणाले की मला जीन्स आणि टी-शर्ट घातलेला शेतकरी हा ट्रॅक्टर वर बसवायचा आहे एक दिवा स्वप्न होतं ते. आणि यात महाराष्ट्राचे राजकारण इतकं निर्ढावलेलं की राज ठाकरे यांच्यासारख्या कलात्मक माणसाकडे लक्ष द्यायला या निर्ढावलेलं समष्टीला वेळ नाहीये ?
उत्तर – मी जेव्हा कोकणात जायचं तेव्हा अनेक लोकं हे लंगोटी किंवा धोतर वगैरे नेसून शेती करायचे परंतु आत्ता मी माझ्या भावंडांना बघतो तर त्यांची आणि टी-शर्ट घालून शेती करत असतात. एकंदरीत त्या विचाराची सुरुवात झाली. आता तेवढेच साहेबांचा उद्दिष्ट न्हवत की त्यांनी टी-शर्ट वर जाऊन शेती करून करावं त्याच्यापुढे त्यांची प्रगती देखील व्हावी असा त्यामागील विचार होता. आज विदर्भात जा किंवा कोकणामध्ये गेलात तर अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक तरुणी जीन्स आणि टी-शर्ट वर दिसतील. तरुण मुली देखील असतात. अनेक व्हिडिओज येतात. त्यात आम्ही पाहतो की तरुण मुली देखील आता आजकाल शेती करत असतात तर राज ठाकरे जी गोष्ट म्हणाले त्याची आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ द्यायला हवा बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा सत्तेत यायला 40 वर्ष लागली होती लवकर करत आहोत प्रत्येक गोष्ट ही राज ठाकरेंनीच करावी . आणि त्याची सुरुवात झाली किंवा ती गोष्ट लगेच झाली नाही तर सर्वांचा भ्रमनिराश होतो. टोलनाका संदर्भात जे काही आम्ही झेललं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात कोणी झेललं नाही. 2014 किंवा 2019 ला सर्वात मोठा नुकसान हे टोल नाक्या संदर्भात झाला आहे. टोलनाक्याचं काय झालं हे प्रश्न वारंवार आम्हाला विचारले जात होते. परंतु आज मी जेव्हा प्रचारासाठी फिरतो तेव्हा अनेक लोक मला म्हणतात की टोल नाके बंद केले हे खूप छान केलं. ठाण्यात जर का विचारलं की टोलनाके कोणी बंद केले तर सर्वात आधी राज ठाकरे यांचे नाव समोर येते.
प्रश्न – आता राज ठाकरे सगळीकडे असं म्हणतात की मशिदीवरचे भोंगे हे उतरवू. हे कधीतरी वास्तवात येईल असं वाटतं का? कारण आपल्याकडे असलेली संपूर्ण राजकीय व्यवस्था ही अशी आहे की एखाद्या धर्माविरुद्ध जातीविरुद्ध इतका धाडसी विचार किंवा निर्णय घेऊ नाही शकत.
उत्तर – हे नक्कीच वास्तवात येईल आत्तापर्यंत ८० टक्के भोंगे हे उतरले आहेत. फक्त राज ठाकरे बोलून हे सर्व होणार नाही. राज ठाकरे बोलले राज ठाकरे च्या माणसाने त्यावर क्रिया केली ती गोष्ट घडली आता ती टिकवण्याचं काम सरकारचं असतं त्या पोलीस यंत्रणेचा असतं. त्यांना माहित असतं की हे अनधिकृत आहे. ३० डेसिमलच्या वरती याचा आवाज नसला पाहिजे. त्यामुळे आम्ही केलेली जी कृती आहे त्याच्यावर एक्सटेंशन करण्याचं काम हे तिथल्या अधिकाऱ्यांचा आहे. ते होत नाही म्हणून अडचणी होतं आहेत. जसं राज ठाकरे म्हणाले भोंगे उतरले पाहिजे ते मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. ठाण्यात माझे जे प्रतिस्पर्धी आहेत केळकर ते सध्या नागरिकांना दाखवत असतात की माझ्यावर शून्य गुन्हे आहेत आणि अविनाश यादव यांच्यावर २४ गुन्हे आहेत . तेव्हा मी लोकांना सांगतो की माझ्यावर पहिला गुन्हा जो आहे तो हनुमान चालीसा लावल्याचा गुन्हा आहे. त्यामुळे मला त्या गुन्ह्याचा अभिमान आहे. खालचे १२ गुन्हे हे माझ्यावर टोल नाक्याचे आहेत. आणि या १२ गुन्ह्यामुळेच आज हा टोल नाका बंद झाला आहे. त्यामुळे लोकांसाठी घेतलेली हे गुन्हे आहेत. यासाठी आमच्या मुलांनी मेहनत घेतली.
प्रश्न – या महिन्याच्या ऑगस्ट महिन्यात जो काही एका आंदोलनाचा प्रकार केला तो बघून एक माध्यमकर्मी म्हणून आजही माझ्या अंगावर काटा येतो. उद्धव ठाकरेंच्या गादीवर जो काही नारळ फेकण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही काय केलं? किंवा काय करायला चालला होता ? राज – उद्धव – आदित्य किंवा अमित असो . महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आहेत याच भान आंदोलन करताना होत?
उत्तर – राज ठाकरेंच्या गादीवर ही लोक गेली तेव्हा त्यांना भान न्हवत का ? की ते पण ठाकरे आहेत असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले.ते आमच्या साहेबांच्या गाडीवर आले म्हणून आम्ही तुमच्या गाडीवर आलो. का उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी त्या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढून टाकले? याच जागी राज ठाकरे असते तर पहिलं पदाधिकाऱ्याला काढलं असत. हि सुरवात उद्धव ठाकरे यांनी का केली नाही ? मोठी पणा का घेतला नाही ? खार तर उद्धव ठाकरे मोठेपणा दाखवूच शकत नाही. तेवढी त्यांची कुवत देखील नाही जी राज ठाकरेंची आहे. मग आमचे महाराष्ट्र सैनिक कुठे चुकले? जश्यास तसंच उत्तर मिळणार. आम्ही हे सर्व आंदोलन पूर्ण पणे प्लॅन करून केली आणि याचा मला गर्व आहे. राज ठाकरेंवर तुम्ही आलात तर आमही तुमच्यावर येणार. आणि आजच नाही उद्या आमदार झाल्यावर देखील हे सर्व घडलं तरी आमही त्या व्यक्तीला सोडणार नाही.
प्रश्न – राज ठाकरे हे महाराष्ट्राचे क्राऊड पुलर म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेला लाखांच्या घरात गर्दी असते. परंतु अविनाश जाधव हे स्वतः सोशल मीडियाचे खूप मोठे क्राऊड पुलर आहेत. त्याने आज अविनाश जाधव ला ठाण्याच्या या रणांगणावर एक योद्धा म्हणून उभं केलं?
उत्तर – मी काही काम केलं कि ते लोकांपर्यंत पोहचत नसायचं त्याच्या बातम्या येत नसायच्या यासाठी मी सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली. आणि माझ्या मते सर्वात बेस्ट माध्यम हे सोशल मीडिया आहे. मी जेव्हा प्रचाला जातो तेव्हा लोक म्हणतात तुमचा हा विडिओ पहिला, तुमचा तो व्हिडिओ पहिला… हे एखाद्या पेपरच्या बातमीत नाही होऊ शकणार. मेनस्ट्रीम मीडिया आणि डिजिटल याचा फहरक हा पटलेला आहे. कारण एक कॉलम शिवाय माझी बातमी केली नाही. आता टीव्ही कोणी बघायला मागत नाही कारण सर्व मोबाईल ला दिसत. आणि त्याच्या खाली एकदाची तरी माझी बातमी किंवा फोटो हे दिसतील.
प्रश्न – अविनाश जाधव सारख्या धडपड्या मुलाची सोशल मीडिया ही ताकद झाली? हे तुम्हाला पटलं का ?
उत्तर – माझी ताकद ही राज ठाकरे आहेत. कारण ते आहेत म्हणून मी आहेत. राज ठाकरे यांनी एखादा आंदोलन घेतलं की ते आंदोलन मी करतो आणि म्हणून मी टीव्हीवर दिसतो.
प्रश्न – राज ठाकरे यांचा आंदोलन म्हटलं की अनेकांच्या छातीत धडकी भरते परंतु राज ठाकरे यांचे आंदोलन दिवाळी दसऱ्यासारखा एन्जॉय करणारा एक वेळा म्हणून अविनाश जाधव यांच्याकडे पाहिले जातात. या आंदोलनांमधून डे बाय डे अविनाश जाधव हा हिरो होत आहे?
उत्तर – असं अजिबात नाहीये कारण राज ठाकरे जी गोष्ट सांगतात ती गोष्ट माझ्यासाठी आहे असं मला वाटतं. टोल नाक्यावर मीही टोल भरला आहे मी महाराष्ट्रात राहतो तर माझी रिंगटोन ही मराठी असावी हे मलाही वाटतं ते बोलत आहेत परंतु ती गोष्ट माझ्यासाठी आहे या भावनेने मी रस्त्यावर उतरतो मी कधीही असं म्हटलं नाही की हे माझ्या पक्षाचं काम आहे मी नेहमी असं म्हणतो की राज ठाकरे जे सांगतात ते माझं काम आहे ज्यावेळेस ती गोष्ट होईल त्यातला एक भाग मी देखील असेल माझ्या पक्षाने दिलेल्या काम म्हणून मी त्या गोष्टीकडे बघत नाही. राज ठाकरेचे बोलतात ते माझ्यासाठी देखील आहे माझ्या कुटुंबीयांसाठी माझ्या मित्रांसाठी देखील आहे आणि हेच मी लोकांना पटवून द्यायचा काम करत आहे त्यामुळे तुम्ही लोकांना कशाप्रकारे ते पटवून देत आहात आणि तुम्ही ती गोष्ट कशी घेत आहात हे महत्वाचं आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या छातीत धडकी येत असेल तर तो त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे.
प्रश्न – गेल्या पाच वर्षात आपण दोन माजी मुख्यमंत्री पाहिले एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस. उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून राजन विचारे यांचं नाव घेतलं जातं. राजन विचारे या शहराचे महापौर, आमदार, खासदार होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या विरोधातले ते नायक होते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या माणसांमध्ये संजय केळकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जातं. या दोन दिग्गज उमेदवारांच्या विरोधात अविनाश जाधव यांचा मुकाबला आहे. परंतु अविनाश जाधव यांचा मुकाबला नेमका कोणाशी आहे?
उत्तर – गेल्या वर्षी माझ्या विरोधात दोन लोकांनी श** ठोकलं होतं. राजन विचारे आणि संजय केळकर. हे दोघेही एकाच गाडीवरून माझ्या विरोधात पंधरा दिवस दिवस रात्र फिरत होते. राजन विचारे हे मला जी लोकं मदत करत होती त्यांना फोन करून सांगत होते की अविनाश ला मदत करायची नाही हे करायचं नाही संजय केळकर यांनाच मतदान करायचे. त्यामुळे आता गेल्या वेळेस जे राजन विचारे संजय केळकर यांच्यासाठी मत मागत होते त्यांना आता स्वतःसाठी सर्वात आधी मत मागावे लागणार. त्यामुळे त्यांची मतं स्वतःकडे नीट खेचण्याचं काम त्यांचं चालू आहे. आणि माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे. माझी मतं ही फिक्स आहेत त्यामुळे हे दोघं एकमेकांसाठी काय मत टिकवता हे बघणं महत्त्वाचं आहे .
प्रश्न – राज ठाकरे एका बाजूला राजकीय व्हिजनवास सहन करतात. न्यूज मेकर म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. असं असताना मनसेचा मतदार हा मात्र ठाणे असो भांडुप, माहीम, विक्रोळी, पुणे, कल्याण नाशिक मतदार संघ या भागांमध्ये अगदी इंटॅक्ट राहिला हे तुमच्या सहकाऱ्यांचे श्रेय आहे हे मान्यच आहे पण त्या मतदाराला तुम्ही काय जाऊन सांगितलं? ठापाबाजी केली?
उत्तर – हा मतदार आम्ही काम करतो म्हणून आमच्या सोबत आहे जे सत्ताधारी निवडून येतात ते त्यांना कधीच भेटत नाहीत. त्यांना अविनाश जाधव, राजू पाटील, संदीप देशपांडे हे भेटतात. आम्ही लोकांचे काम करतो आणि ज्यांचे काम करतो तेच आम्हाला मतदान करतात आम्ही कोणाच्या उपकारांवर जगत नाही. आम्ही ज्या लोकांचं काम केलं आहे ते सर्व लोक आम्हाला मतदान करतात. मागच्या वेळेस विरोधी पक्षांनी सांगितलं होतं की मला २०,००० मत मिळणार नाही परंतु मी ७५,००० मतं मिळवली होती आणि आत्ता मी हे सांगू शकतो की मला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळतील कारण मी जे काम केलं आहे त्यामुळे मी हे सांगू शकतो. आणि संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उदाहरण ठेवील की काम केलेल्या मुलाला लोक मतदान करतात तुम्ही कुठल्या मतदारसंघात उभे आहात त्याची कुठलीही फिकर नसते. तुम्ही काम करा लोक तुमच्या सोबत असतील. मला खात्री की मी १ लाख मत क्रॉस करेल. सगळीकडे दोन प्रकारचे मतदार असतात. एक थांब राहणारा मतदार वर्ग असतो आणि दुसरा फ्लूट होणारा मतदार वर्ग असतो या फ्लूट होणाऱ्या मतदार वर्गाला ते लोक बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी जेव्हा जातो तेव्हा त्यांना खात्रीने सांगतो की मी निवडून येणार आहे कारण ठाण्यात केलेलं काम हे लोकांना माहित आहे.
प्रश्न – गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री आहे. ठाणे महानगरपालिकेची सत्ता बनवण्यापासून एखादा प्रकल्प बनवण्यापर्यंतच्या गोष्टी असुद्या, याकडे मुख्यमंत्री जास्त ,दुर्लक्ष करत नाहीत. अश्यातच आता एखादा नेता मुख्यमंत्र्यांना निवडणुकांआधी भेटत असेल तर ती व्यक्ती राज ठाकरे आहे. या दोन नेत्यांमध्ये सध्या काहीसा बेबनाव तयार झाला आहे याचा फटका अविनाश जाधव सारख्या एका तरुण उमेदवाराला किती बसू शकतो? कारण आजही ठाण्यामध्ये शिंदे शाही आहे. जेव्हा त्यांनी बंद केलं तेव्हा एक नगरसेवक सोडला तर सर्व नगरसेवक हे त्यांच्यासोबत होते अशा परिस्थितीत शिंदे शाही अविनाश जाधव यांच्यासोबत असणार की संजय केळकर यांच्यासोबत असणार ?
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाहीये. मी सोबत मतदार म्हणून पाहत आहे तो वर्ग माझ्याबद्दल काय विचार करतो हे मी पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की तू मतदार कोणाचाही असो तो आज काय विचार करतोय त्यांचे विचार करण्याची जी क्षमता आहे ते काम करणाऱ्या माणसाची आहे. जर त्यांचा उमेदवार तसा नसेल तर तो मतदार नक्कीच मला निवडून देईल असं मला वाटतं.
प्रश्न – अविनाश जाधव म्हणजे आंदोलन अविनाश जाधव म्हणजे राडा राज ठाकरे यांच्या डोक्याला ताप असे गेल्या 18 वर्षांपासून चालू आहे. परंतु अविनाश जाधव यांच्या हेतू बद्दल यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंकेला फारसा वाव हा नाही. तर आंदोलन करायचं त्याच्यातून तोड पाणी करायची आणि दुसरीकडे आंदोलन करायचा आणि फक्त राज ठाकरे ही पाच अक्षरे उच्चरायचे ही अविनाश जाधव यांची स्टाईल आहे यामधील जी पुसट एक रेष आहे ती सपनात गेली १८ वर्षे अविनाश जाधव यांना किती कठीण आहे की किती सोप्प गेला?
उत्तर – तुम्ही मला आंदोलनकार या नजरेने पाहतात परंतु तुम्ही मला अडीच हजार मुलींची लग्न लावून दिली या नजरेने का नाही पाहिलं? आदिवासी भागात हे आत्तापर्यंत कोणत्या नेत्याने किंवा आमदाराने केला आहे अडीच हजार मुलींची लग्न करणं ही छोटी गोष्ट नाही. आतापर्यंत मी साडेतीनशेहून जास्त लोकांच्या मोतीबिंदूंचे ऑपरेशन ज्युपिटर सारख्या मोठ्या रुग्णालयात केले. पालघर मधल्या मुलींनी शाळेत जावे म्हणून त्या मुलींना मी सायकल वाटप केलं. या गोष्टी समोर नाही येत. तुम्ही म्हणजे आंदोलनच दाखवता परंतु या आंदोलनाच्या पाठी देखील एक अविनाश जाधव आहे. त्याची दुसरी बाजू देखील आहे. ज्यावेळी कामगारांना पगार मिळाले नाही त्यावेळेस अविनाश जाधव यांनी स्वतःच्या कंपनीच्या अकाउंट मधून 25 लाख रुपये काढून कामगारांच्या घरी दिवाळी म्हणून वाटले. मी आंदोलन केलं हे दिसतं परंतु त्याच्यापेक्षा मी रोजची चांगली काम करतो ती का नाही दिसत? या महाराष्ट्रातला एक माणूस दाखवा ज्याने आतापर्यंत अडीच हजार मुलींची लग्न लावले आहेत.
प्रश्न – मग महाराष्ट्र कोणत्या अविनाश जाधव वर प्रेम करत आहे असं तुमचं मत?
उत्तर – आता जो मी पाहतोय तो मदत करणाऱ्या अविनाश जाधव वर लोक प्रेम करत आहेत. जो मदत करतो त्या अविनाश जाधव समोर लोक आहेत.
प्रश्न – ठाण्याची जनता शिवसेनेवर डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवते ते ठाणेकर आता कुस बदलतील असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर – ज्यावेळेस मला ७० हजार मतं मिळाली त्यावेळेसच त्यांनी बदलली. आणि यावेळेस मी एक लाख मतं नक्कीच क्रॉस करेल. जर शिवसेनेला ठाणे शहरात तीन लाख मतं पडली आहेत तर मलाही त्यावेळेस दीड लाख मतं पडली होती. म्हणजे प्रत्येक दोन माणसांमधला एक माणूस आमच्यावर प्रेम करत आहे मतदान करत आहे.
प्रश्न – भावी आमदार असणाऱ्या अविनाश जाधव ला ठाण्यासाठीची जर पंचसूत्र विचारली तर ती काय असतील ?
उत्तर – मला एक दोन गोष्टी ठाण्यात प्रामुख्याने करायचे आहेत ठाण्यात पाणी नाही आहे त्यामुळे अनेक सोसायटीमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे की ते रोज सव्वा लाख दीड लाखांचा पाणी घेतात ठाणे महानगरपालिका ही एकमेव अशी पालिका आहे ज्याचं बजेट साडेतीन चार हजार कोटी रुपये असून देखील आमचं पाण्याचं धरण नाही. मी आलो तर पहिलं पाण्याचे धरण जे गेल्या २२ वर्षांपासून थांबलं आहे ते पूर्ण करण्याचा काम करेल. जर माझ्या मुलाला घेऊन ठाण्यामध्ये फिरायला जायचं असेल तर अशी कुठलीही तीन ठिकाणी अद्याप ठाणेकर सांगू शकत नाहीत मला ती तीन ठिकाणी उभी करायची आहेत. दुबईला जो फाऊंटन शो होतो तो मला ठाण्यातील तलापाई ला आणायचा आहे. संपूर्ण ठाण्यात कोणाच्याही घरी नातेवाईक आले तर ते हक्काने म्हटले पाहिजे की सर आमच्या ठाण्यात हा फाउंडेशन आहे ते मी तुला दाखवायला देतो. ठाण्यात एक उत्तम दर्जाचा संग्रहालय उघडेल. तसेच ठाण्यात उत्तम दर्जाची एक अभ्यासिका खोलेल जेणेकरून आमची मुलं देखील भविष्याच्या काळात यूपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेसाठी तिथे बसून अभ्यास करतील. मनात आत्ताची परिस्थिती अशी आहे की जरी ठाणे सुंदर असलं तरी लोकांची छोटी छोटी घरं आहेत. एका घरात पाच पाच लोक राहतात त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जे वातावरण लागतं ते मुलांना मिळत नाही. त्यामुळे ते उभं करेल. ठाणे हे कलानगरी असलेला आहे ठाण्यातील तलावांच्या बाजूला प्रत्येक शनिवारी रविवारी कल्चरल कार्यक्रम होतील हे मी नक्कीच बघेल. पाच वर्षात मी इतका उत्तम काम करेल की पुढच्या वेळेस मला मतदान मागण्यासाठी कोणाच्या दारात जावं लागणार नाही लोक मला स्वतःहून मतदान करतील.
प्रश्न – स्वर्गीय आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा दोस्ताना हा विलक्षण होता आनंद दिघे यांची आणि माझी ओळखच राज ठाकरे यांनी करून दिली. निवडणूक आली की ठाण्याच्या राजकारणात समाजकारणात आणि ठाण्याच्या सर्व भागांमध्ये पाच अक्षर उच्चारले जातात आणि त्याच्यावर मत मागितली जातात. आता राज ठाकरे ही पाच अक्षर तुमच्याकडे देखील आहेत. परंतु आनंद दिघे यांचा विजयाचा जो काही मंत्र आहे तो मनसे साठी उपयोगी पडेल का? आणि जर का तो पडणार असेल तर तो राज ठाकरे यांच्या माध्यमातून पडणारे का?
उत्तर – प्रत्येक ठाण्यातील लोकांच्या घरात तरुणांच्या मनात आनंदी हे आदर्श आहेत देवाप्रमाणे आनंद दिघे यांच्याकडे पाहिला जातो त्यांनी गोरगरिबांसाठी केलेली काम जी होती तोच मूळ मंत्र घेऊन मी पुढे चाललो आहे. माझ्या कार्यालयात हीच गोरगरीब लोका नेहमी असतात. माझ्या कार्यालयात येणारा माणूस याचा कुठेतरी पगार अडकला आहे त्याचं लाईटचे बिल जास्त आलं आहे कोणाचा तरी पाण्याचं कनेक्शन कापला आहे कुठला गल्लीत लाईट नाहीत अशी सर्व लोक माझ्याकडे असतात. माझ्या कार्यालयात कोणी बिझनेस मॅन किंवा व्यापारी आज तगायत कोणी पाहिला नसेल. त्यामुळे आनंदी यांचा जो मूलमंत्र होता तोच मुलमंत्र घेऊन मी पुढे चाललो आहे. त्यामुळे लोकांनी माझ्याकडे पाहताना कोणीतरी आहे जो आनंद दिघे यांचा वारसा पुढे घेऊन जात आहे आणि राज ठाकरे यांचा आशीर्वाद आहे असा लोकल ठाण्यात विचार करत आहेत. आनंद दिघे यांचा खरा श्रेष्ठ कोण या स्पर्धेत आम्हाला उतरायचं नाही. दिघे साहेबांचं खरं काम कोण करतय तर यामध्ये मध्यवर्ती कार्यालयातून ते होत आहे. आनंद दिघे यांच्या नावाचा आम्हाला किती फायदा होईल याच्यापेक्षा दिघे साहेबांच्या विचारांचा मला किती फायदा होईल हे विचार घेऊन मी पुढे चाललो आहे. मला आनंद दिघे यांच्या नावाची गरज नाही त्यांनी केलेलं काम त्यांचे विचार घेऊन मी पुढे चाललो आहे आणि भविष्याच्या काळात ते अजून मोठ्या प्रमाणात होईल.
हे ही वाचा:
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.