Friday, December 1, 2023

Latest Posts

MNS आली ॲक्शन मोडमध्ये, कल्याणमध्ये मराठी युवकाचा अपमान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांची मारहाण

आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभर संपूर्ण राज्यात अनेक घडामोडी या घडल्या आहेत.

आज संपूर्ण दिवसभर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभर संपूर्ण राज्यात अनेक घडामोडी या घडल्या आहेत. तसेच मनसेने देखील अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. नुकतंच मुलुंड मधील प्रकरण उघडकीस आले त्यापाठोपाठ कांदिवलीमधील प्रकरण उघडकीस आले आता आता कल्याणमध्ये मनसेने आक्रमक भुमिका ही घेतली आहे. मराठी आणि परप्रांतीय असा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

वाशिंद येथे राहणारा कैलास पवार हा विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण मधील फुटपाथवरील फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. मात्र, ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आला आणि त्या फेरीवाल्याकडून ती वस्तू बदलून मिळण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र, फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर त्याने ‘तुम मराठी लोक ऐसें ही होते हो’ असे बोलून मराठी माणसाचा अपमान करण्याच्या हेतूने वक्तव्य केले. या विद्यार्थ्याने कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्याला जोरदार चोप दिला. या घटनेवरून परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे.

नुकतंच मुलुंड मुलुंडमधील एका इमारतीत तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला. तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. तर मुलुंड पाठोपाठ कांदिवली मध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीस आला. जय श्री रामचा नारा दिला नाही म्हणून परप्रांतीयांच्या एका टोळक्याने मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना कांदीवली पूर्वमध्ये (Kandivali East) घडली आहे. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनाी दोन जणांना अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. परप्रांतीय तरुणांच्या चार जणांच्या टोळक्याने एका मराठी मुलाला ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास सांगितले. मात्र त्याने ‘जय श्रीराम’चा नारा दिला नाही म्हणून या चार तरुणांकडून त्या मराठी मुलास बेदम मारहाण केली.

हे ही वाचा: 

मराठा आरक्षणच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांनी केली छगन भुजबळ यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केले जनतेला आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss