निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आनंद परांजपे यांनी आज (गुरुवार, २८ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणले, “लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातली जनता मविआच्या मागे उभी आहे. अशा प्रकारचा टाहो माविआचे सर्वच नेते फोडत आहे. लोकसभेला जे मिळालं ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं, अशाप्रकारची यशोगाथा सांगत फिरत होते. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आलेले यश नाकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. लोकसभेला यश मिळालं ते महाराष्ट्राच्या जनते मुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारे रडीचा डाव सुरू आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “माझं खुल आव्हान जितेंद्र आव्हाड यांना आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते तर त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा. बॅलेट पेपर वर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. लोकसभेला ज्यावेळेस यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभा त्यांना जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकत अशा प्रकारची थियरी मविआचे नेते समोर आणत आहेत. लोकशाही मधे जनतेने दिलेला कौल मान्य करायचा असतो.”
“महाराष्ट्रात २३५ पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून डेट असताना एक विश्वास महायुती वर व्यक्त केला. ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ने काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर युती केली महाविकास आघाडी केली त्यावेळेला शिवसेनेचा मतदार हा शिवसेना पक्षापासून दूर होत होता, शिवसेनेला त्याचा अंदाज आला नाही. लोकसभेला देखील शिवसेनेचे नेतृत्व करत असलेले एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून आले २०१९ ला शिवसेना एकत्र होती त्यावेळेला ५६ जागा विधानसभेला निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अभूतपूर्व यश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळालं. त्यामुळे शिवसेना उबाठा ने आत्मचिंतन करावं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम महाराष्ट्रामध्ये केलं. त्यांच्या नेतृत्वावर अन्याय करून ज्या वेळेला वेगळी राजकीय भूमिका आमचे नेते अजित पवार यांना घ्यावी लागली त्यावेळी महाराष्ट्राची जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूने उभी राहिली आणि शरद पवार यांना स्पष्ट दाखवून दिलं तुमच्या विचारांचा खरा वारसदार पक्षांचा नेता हे अजित पवार आहेत,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule