मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा तोडण्यात आली आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंब्र्यात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे येणार असल्याने शिंदे गटाचे कार्यकर्तेही मुंब्र्यात जमले आहेत. त्याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मुंब्र्याच्या शाखेबाहेर एकवटले आहेत. आजच उद्धव ठाकरे यांचे मुंब्र्यातील बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन दोन्ही गटांनी परस्परांना इशारे दिले आहेत. त्यामुळे मुंब्र्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे येणार असल्याने मुंब्र्यात ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यापासून मुंब्र्यापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मुंब्र्यात ५०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३ एसआरपीएफच्या तुकड्या, २ दंगल नियंत्रण पथक, ३ डीसीपी, ९ पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी अधिकारी यावेळी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रत्येक टीमला वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे.
मुंब्र्यात शिवसेना शाखेबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी आणि नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधला. “ठाण्याचा विकास कसा झाला हे उद्धव ठाकरे यांनी पहाव. माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांना अभिमान वाटेल, एकेकाळी माझ्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय” असं नरेश म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरे यांचं स्वागत कस करणार? या प्रश्नावर नरेश म्हस्के म्हणाले की, “प्रेम से बोलो, प्रेम मिळेल. पण राग, पूर्वग्रहदूषित उद्देशाने वागलात तर आम्ही तसेच वागू. आम्ही ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत” असं नरेश म्हस्के म्हणाले. “हा रस्त्यावरचा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही इथे आलेत, कारण आमची बाजू सत्याची आहे” असं नरेश म्हस्के म्हणाले. ‘आव्हाडांनी मुंब्र्यातील शिवसेना संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले’
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं स्वत: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड स्वागत करणार आहेत. जेसीबीच्या सहाय्याने मुंब्रा वेशीवर आव्हाड हे ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत. मात्र, आव्हाड यांनी ठाण्याच्या वेशीवर येऊन उद्धव ठाकरे यांचं स्वागत केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कळव्यात स्वागत करण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…