spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

Palghar Fire : पालघरमधील रासायनिक कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये (Boisar Tarapur MIDC) आहे.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये (Boisar Tarapur MIDC) आहे. बोईसर येथील सलवड शिवाजी नगर भागातील यूके ॲरोमॅटिक ॲण्ड केमिकल्स (UK Aromatic and Chemicals) फॅक्टरीत भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे, ज्यामध्ये प्रचंड आगीच्या ज्वाला उठत आहेत आणि काळा धूर ही मोठ्या प्रमाणात निघत आहे. खूप मोठा आवाज देखील आला आहे. जो कदाचित कारखान्यात काहीतरी फुटल्याचा आवाज असावा. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, तसेच या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

पालघरमधील कारखान्याला आग लागण्याची ही पहिली घटना नाही . मागील महिन्यात तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला आग लागली होती. तर २० सप्टेंबर रोजीही एका केमिकल कारखान्याला आग लागली होती, त्यात सहा कर्मचारी जखमी झाले होते. जून महिन्यात एका केमिकल कारखान्याला आग लागली होती. मात्र, या घटनेत कोणतीही आर्थिक हानी झाली नाही.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss