Wednesday, November 15, 2023

Latest Posts

दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीला प्राधान्य, ठाण्यात विक्रमी विक्रीची नोंद

ठाणे शहरात तब्बल ३२०० पेक्षा जास्त घरांची विक्री झळायची माहिती समोर आली आहे. यंदाच्या दसऱ्याला गृह खरेदीला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. २२०० कोटींचा व्यवहार एका दिवसात झाल्याची माहिती ठाणे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

दसऱ्याच्या निमित्ताने सोने-चांदी तसेच विविध गोष्टींची खरेदी केली जाते. दसऱ्याच्या मुहूर्तावर इतर गोष्टींसोबतच घराच्या खरेदीला सुद्धा अनेकजण प्राधान्य देतात. म्ह्णूनच, ठाणे शहरात तब्बल ३२०० पेक्षा जास्त घरांची विक्री झळायची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी १ कोटींपर्यंतच्या १ आणि २-बीएचके घरांना सर्वाधिक प्रतिसाद दिला तसेच घोडबंदर परिसरात सर्वाधिक खरेदी व्यवहार झाल्याचा दावा मेहता यांनी केला आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी २० टक्क्याहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून देण्यात आली. यंदाच्या दसऱ्याला गृह खरेदीला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. २२०० कोटींचा व्यवहार एका दिवसात झाल्याची माहिती ठाणे एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

किड्स प्ले एरिया, मल्टिपल स्विमिंग पूल, गार्डन क्लब हाऊस, जिम्नॅशियम, मिनी थिएटर, लार्ज ओपन स्पेस, पोडियम पार्किंग यांसारख्या सुविधा नागरिकांना आकर्षित करत असतात. हे सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे मागील दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक गृह खरेदी झाली आहे, असा दावा एमसीएचआयकडून करण्यात आला.

ठाणे शहर अधिक विकसित होत आहे. त्यात मुंबई जवळील ठिकाण असल्यामुळे बरेच नागरिक पहिले किंवा सेकंड होम घेण्यस्तही ठाणे शहराला पसंती देतात. नोकरीची ठिकाणे, कंपनी, फिरण्याची ठिकाणे, येण्या-जाण्याची योग्य सोय या सर्व गोष्ट लक्षात घेता, ठाणे हे शहर प्रत्येकाला ‘बेस्ट’ वाटत असतं. ‘तलावांचे शहर’ अशी ओळख असणारे ठाणे शहर घरांच्याबाबतीत आता समृद्ध होत आहे. म्ह्णूनच, घर खरेदीसाठी नागरिक ठाण्याला प्राधान्य देत आहेत.
मुंबई पश्चिम उपनगराकडे जाण्यासाठी सोयीच्या ठरणाऱ्या घोडबंदरच्या काही भागांमध्येही मोठी गृहविक्री झाल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांकडून देण्यात आली.

हे ही वाचा : 

Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss