Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणवासी मोठ्या संख्येने कोकणात जात आहेत. कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणेशोत्सव. गणपतीच्या तीन ते चार महिना आधीपासूनच गावी जाण्यासाठी तिकीट आरक्षित करत असतात. हजारोच्या संख्येने कोकणी माणसू आपल्या गावाला जात आहे. तसेच गावी जाण्यासाठी मुंबईतील प्लॅटफॉर्मवर मोठया प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे काहींच्या ट्रेन देखील सुटल्या आहेत. मात्र कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे कोकणवासीयांना रेल्वेस्थानकांवर ५ ते ६ तास ताटकळत थांबावं लागत आहेत. १२ तासांच्या प्रवासासाठी १८ तास लागत आहेत.
कोकण मार्गाच्या डाऊन मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावला आहे. सर्व गाड्या तीन ते चार तासाने उशिरा येत आहेत. त्यामुळे नियोजित गाड्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. आज सकाळी सीएसएमटीहुन मडगावला जाणारी मांडवी एक्सप्रेस सुटलीच नाही. कोकण उत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना तात्कळत थांबावे लागत आहे. यंदाच्या वर्षी कोकणात जाण्यासाठी २०० हुन अधिक गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गणपतीच्या आगमनाला आता फक्त एकच दिवस बाकी असल्यामुळे प्रवाशानी दिवा रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान आजही दिवा स्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. तसेच प्रवासी आपला जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करत आहेत. कोकणात जाणाऱ्या लोकनाची संख्या मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे दिवा, लोकमान्य टिळक टर्मिनल्स वरून गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
“कोकण रेल्वेच्या नियोजनाच्या अभावामुळे सर्व ट्रेन 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत. मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरज मार्गे न वळवल्यानं आणि मालगाड्या सुरू ठेवल्यानं, चाकरमन्यांना तब्बल 18 तासांचा प्रवास करावा लागत आहे, लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमन्यांनी तीनशे रुपयांचं तिकीट काढून मुंबईतून यायचे आणि स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयांची रिक्षा करून घरी जायचं का?”, असा सवाल प्रवाशी संघटनांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये उभारण्यात येणार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र
आदित्य ठाकरे यांचा दुष्काळग्रस्त भागात दौरा , शेतकऱ्यांशी साधला संवाद