spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Ganesh Naik यांच्या जनता दरबाराला शिवसेनेचे ‘समस्या, सेवा, समाधान’ ने उत्तर

ठाण्यात शिंदेसेना विरुध्द भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठाण्यात शिंदेसेना विरुध्द भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतला आहे. आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील ‘समस्या, सेवा, समाधान’ असे म्हणत जनतेचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे. त्यानुसार जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आज आनंद आश्रम येथे मनोज शिंदे, उपशहर प्रमुख अशोक वैती तसेच माजी नगरसेवकांसह शहर प्रमुख व उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावल्या जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे.

मागील दोन महिन्यांपासून शिंदे सेना विरुध्द भाजप असा सामना ठाण्यात रंगू लागला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील. यावेळी ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून ६५० हून अधिक नागरीक या जनता दरबारात येऊन गेले. यावेळी नाईकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या. मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केले, याचे उत्तर या महिन्यात घेतले जाणार आहे. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्था पसरली आहे. त्यातही जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात, तेथेच नागरीकांच्या समस्या सोडविल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. या निमित्ताने शिंदे सेना आणि भाजपमधील दुरावा वाढत जात असतांनाच आता शिंदे सेनेच्या शिलेदारांनी देखील ठाणेकरांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी विडा उचलला आहे.

नाईकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना एक महिना थांबावे लागणार आहे. मात्र, आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याची काहीशी हमीच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आनंद आश्रम येथे तर प्रत्येक गुरुवार ठाणे महानगरपालिकेच्या समस्या, सेवा, समाधान या कार्यक्रमाअंतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेने दिली आहे. या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आठवड्यातून एकदा अशा पध्दतीने ठाणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. यात मी स्वतः, मनोज शिंदे आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख उपस्थित असणार आहेत. यातून ठाणेकरांच्या समस्या सुटल्या तर त्याचे समाधान निश्चित आम्हाला असणार आहे. असं अशोक वैती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज मोठ्या संख्येने नागरिक या आनंद आश्रमात उपस्थित असल्याचही वैती यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांनी पापात सहभागी व्हावं, स्वतःहून मी हे पाप केलं अस म्हणायला पाहिजे – मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य

नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा घेतला…राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रक जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss