spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

धक्कादायक खुलासा ! कल्याण अत्याचार प्रकरणी बायको आणि मित्रानेच केली मदत

कल्याण पूर्वेकडील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दिवसेंदिवस राज्यात लाजवणाऱ्या घटना घडत आहेत. बदलापूर घटनेनंतर अशीच एक घटना कल्याणमद्ये घडली आहे. विशाल गवळी या नराधमाने १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. कल्याण पूर्वेकडील एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नराधम विशाल गवळीने त्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला आणि त्यानंतर पत्नी व रिक्षाचालक मित्राच्या साहाय्याने तीच मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कल्याणामध्ये खळबळ  माजली असून संतापाची लाट उसळली आहे.

एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एका अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या घटनेतील आरोपी शेगावमध्ये असल्याची टीप मिळाल्यानंतर शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलून मधून शेविंग करत असताना विशाल गवळीला ताब्यात घेतले.

साधारणपणे वर्षभरापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये विशाल गवळीला एक अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या गवळीने तीन दिवसांपूर्वीच पुन्हा एका अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात नेलं, तिच्यावर लैगिक अत्याचार केला आणि हे प्रकरण कोणालाही समजू नये म्हणून त्या मुलीचा आवाज कायमचा बंद केला. बायको घरात आल्यावर निर्लज्जपणे आपले कृत्य सांगत त्याने आपलीच पत्नी आणि रिक्षाचालक मित्राच्या साहाय्याने त्या मुलीचा मृतदेह बापगावमधील कब्रस्तानात फेकून दिला. त्यांनतर पत्नीला तू कल्याणमध्ये थांबू नकोस असे सांगत माहेरी निघून जा असा सल्लाही दिला. कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी आरोपी विशालने एका दुकानातून मद्य विकत घेतलं. त्यानंतर त्याने ठाणे, तिथून दादर गाठलं. दादरमधून त्याने एक्स्प्रेस ट्रेन पकडली आणि शेगाव गाठलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Online Shopping Fraud : ऑनलाईन शॉपिंगवेळी रिफंड लिंक क्लिक केली आणि घडला ‘हा’ प्रकार

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss