spot_img
spot_img

Latest Posts

डोंबिवलीतील धक्कदायक बातमी रात्री प्रवाशांच्या डोळ्यात स्प्रे मारून..

रात्रीच्या वेळी रस्त्यावर सामसूम असल्याचा फायदा घेत प्रवाशांची लूटमारीचे प्रकार सुरू असतात. रस्त्याने एकट्या जाणाऱ्या प्रवाशाला हेरून त्याच्याकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागायचा, मोबाईल दिला नाही तर त्याच्या डोळ्यात स्प्रे (spray) मारून लुटपाट करण्यात आली असल्याची घटना कल्याण (Kalyan) मध्ये घडली आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावर सामसूम असल्याचा फायदा घेत प्रवाशांची लूटमारीचे प्रकार सुरू असतात. रस्त्याने एकट्या जाणाऱ्या प्रवाशाला हेरून त्याच्याकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागायचा, मोबाईल दिला नाही तर त्याच्या डोळ्यात स्प्रे (spray) मारून लुटपाट करण्यात आली असल्याची घटना कल्याण (Kalyan) मध्ये घडली आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी (Mahatma Phule Chowk Police) या सराईत चोरट्याला २४ तासाच्या आत तपास करत अटक केली आहे. शाहिद शेख (Shahid Sheikh) उर्फ छोटा बेरिंग असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास विजय अग्रवाल (वय ३८) हे एकविरानगर येथे त्यांचे घरी पायी चालत जात होते. संतोषी माता रोड, सहजानंद चौक जवळ, त्याच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना त्यांचा मोबाईल मागीतला. परंतू विजय यांनी मोबाईल देण्यास नकार दिला. विजय मोबाईल देत नाहीत हे पाहून आरोपीने त्याच्या डोळ्यात रेलीफ स्प्रे मारत त्यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल जबरीने काढून तेथून पळ काढला. विजय यांनी याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे (Ashok Honmane) व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील (Pradeep Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करत तपास सुरू केला. या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी उल्हासनगर परिसरात सापळा रचत आरोपीला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार शाहिद हा सराईत गुन्हेगार आहे. शाहिद याच्यावर कल्याण पश्चिम परिसरातील महात्मा फुले, बाजारपेठ व खडकपाडा पोलीस ठाण्यात ७ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा: 

१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ

Asia Cup 2023, श्रीलंकेचा बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss