कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महारेरा प्रकरणातील ६५ इमारती मधील हजारो रहिवाश्यांना प्रशासकीय पातळीवर सर्वोतोपरी मदत करुन सर्वसामान्य निष्पाप रहिवाश्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठी कायदेतज्ञ सल्लागार नेमून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.
मुंबई येथील मुक्तगिरी ह्या शासकीय निवासस्थानी कडोंमपा क्षेत्रातील खोट्या महारेरा प्रकरणात फसगत झालेले ६५ इमारती मधील पाच सहाशे बाधित रहिवाश्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मा. उच्च न्यायालयाने दिलेले कारवाईचे आदेश आणि महानगरपालिकेकडून होणाऱ्या संभाव्य कारवाई पासून आम्हाला सोडवा अशी विनंती करण्यासाठी भेटले असता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे प्रकरण रहिवाश्यांकडून जाणून घेतले, या प्रकरणावार माझे पूर्ण लक्ष असून, मा. उच्च न्यायालयाने कारवाई करण्याच्या आदेशासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून कसा मार्ग काढता येईल यावर कायदे तज्ञ ह्यांच्याशी चर्चा सुरु असून प्रशासकीय पातळीवर सुद्धा सर्वोतोपरी मदत करुन सर्वसामान्य निष्पाप रहिवाश्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
नुकतेच बदलापूर येथील दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या रहिवाश्यांना दिलासा मिळणेबाबत सरकार म्हणून प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. याची आठवण करुन देत, या अगोदर अडीच वर्ष कार्यभार सांभाळलेल्या शिंदे सरकारने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक विषयात नागरिकांना दिलासा दिला आहे. मग तो म्हाडा प्रकल्पातिल रहिवाश्यांच्या मासिक हप्त्याचा विषय, बीएसयूपी प्रकल्पातील घरांचा विषय, २७ गाव ग्रामिण भागातील वाढीव मालमत्ता कर अशा अनेक विषयात सरकार म्हणून आणि नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून बाधित नागरिकांना दिलासा दिलेला आहे. क्लस्टर योजना आणून, जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. उल्हासनगर येथे देखील नगरविकास खात्या मार्फत नियमावली बदलून नवीन निर्णय घेऊन दिलासा दिला. तसंच ह्या महारेरा प्रकरणातील रहिवाश्यांच्या पाठीशी सुधा आम्ही आहोत, आपण मला तीन वेळा निवडून दिले ह्याची जाणीव ठेवून पूर्णपणे सहकार्य करणार असून त्यांना दिलासा मिळे पर्यंत एक लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करणार असून ह्या प्रकरणातील निष्पाप रहिवाश्यांना मदत आणि खऱ्या आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे हीच भूमिका घेऊन पुढे जाणार असल्याचे आश्वासन ह्या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी जमलेल्या शेकडो नागरिकांना दिले.
तत्पूर्वी रहिवाश्यांतर्फे जितेंद्र पवार आणि अशोक दोशी ह्या दोघांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ह्या बाबत लक्ष घालून सहकार्य करावे व आम्हा निर्दोष नागरिकांना तोडक कारवाईच्या व्यापातून कायम स्वरूपी मुक्त करावे अशी प्रतिनिधीक मागणी केली. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रवी पाटील, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, नगरसेवक नितीन पाटील, रणजीत जोशी, युवाजिल्हा प्रमुख जितेन पाटील, शहरप्रमुख सागर जेधे, विवेक खामकर, बाळा म्हात्रे, संजय निकते, दीपक भोसले, संदेश पाटील, राहुल म्हात्रे हे पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा:
डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाचे आजही रजिस्ट्रेशन सुरु, शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपानंतर एकच खळबळ
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.