कल्याण डोंबिवलीसह(Kalyan-Dombivali) नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानले आहेत.
या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.
केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात सुप्रियाताईंचा शंकनाद,आंदोलनाला सुरुवात
नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत- CM Devendra Fadnavis