spot_img
spot_img

Latest Posts

मराठा आरक्षणाच्या पार्शवभूमीवर आज ठाणे बंद

जालना येथील अंतरवाली गावात मराठा समाज आरक्षणासाठी बसले असता पोलिसांनी आंदोलकानावर लाठीमार केला.

जालना येथील अंतरवाली गावात मराठा समाज आरक्षणासाठी बसले असता पोलिसांनी आंदोलकानावर लाठीमार केला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. तर आता या लाठीमाराचा निषेद करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी ‘ ठाणे बंद ‘ पुकारण्यात आला आहे. या बंदला मराठा समाजातील सर्व नेत्यांनी पाठिंबा दिल्याने शहरातील जनजीवन विसखळीत होण्याची शक्यता आहे. हा मोर्चा अहिंसक मार्गाने करण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला आहे. तर या बंदमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

जात, धर्म, पंत हे सर्व बाजूला ठेवून सर्वानी एकत्र यावे असे आव्हान मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली. हा बंद सर्व स्तरावर यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आहेत. ठाणे शहरात हा बंद केला जाणार असून या बंद काळात कोणत्याही प्रकारे हिंसा न करता हा बंद यशश्वी करण्यात येणार आहे. नागरिकांनाही सनदशीर मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली जाणार असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले. ठाणे बंदच्या पार्शवभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरात ४५ निरीक्षक, १६० सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सुमारे १ हजार ३०० कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यातील आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करू नये म्हणून पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांचे खासगी निवासस्थान ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शनजवळ असल्याने बंदच्या पार्श्वभूमीवर येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

ठाणे बंदमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी सरकारी आणि खाजगी कार्यालयातील नोकरदार वर्गासाठी ठाणे परिवहन सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील सकाळची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर रिक्षा संघटनांनी बंदमध्ये थेट सहभागी होणे टाळले असून बंदच्या परिस्थितीप्रमाणे रिक्षा चालक निर्णय घेतील, असे रिक्षा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा: 

रोज माऊथवाॅश वापरत आहेत? वेळीच सावध व्हा

हिटरचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss