Monday, December 4, 2023

Latest Posts

THANE: मुख्यमंत्र्यांनी घेतला ठाण्यातील मिसळीचा स्वाद

माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना ग्राम पंचायतमध्ये जनतेने जागा दाखवली. आज त्यांना ७ व्या क्रमांकावर पाठवलं, उद्या त्यांचा १० वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही आरोपांना मी कामातून उत्तर देईन, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवसेनेच्या (SHIVSENA) वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट (DIWALI PAHAT) कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक (PRATAP SARNAIK), आमदार रवींद्र फाटक, (RAVINDRA FATAK) शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के (NARESH MHASKE) तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचं बिल मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलं आणि आपण कसे कॉमन मॅनच आहोत हे दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या वागणूकीमुळे उपस्थित शिवसेना कार्यकर्ते आणि ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांचा जयजयकार केला.

आज ठाण्यात तरूणाईचा जल्लोष दिसतोय सर्वांना मी शुभेच्छा दिल्यात. राज्यातही सर्वत्र दिवाळी निमित्त उत्साहाचं वातावरण आहे. सर्वत्र उत्साह जल्लोष बघायला मिळतोय. राज्यातील सर्व संकट अरिष्ट दूर व्होवो. दिवाळी सुरू झाली, काल फुसका बार आला पण तो वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यु टर्न घ्यावा लागला. दिवाळीच्या दिवसांत आशा प्रकारे विघ्न घालायला कोणत्याही राजकीय नेत्याने येणं चुकीचं आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांनी शक्तीचं दर्शन दाखवलं आणि आपले सण परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना ग्राम पंचायतमध्ये जनतेने जागा दाखवली. आज त्यांना ७ व्या क्रमांकावर पाठवलं, उद्या त्यांचा १० वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही आरोपांना मी कामातून उत्तर देईन, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी यावेळी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका

क्रेग हॅमिल्टन यांनी अमेरिकेवर मोठी नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचं भाकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss