spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

कोणत्याही स्वरुपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला, २०२५-२६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. यात ३७२२ कोटी ९३ लाख महसुली खर्च आणि १९२१ कोटी ४१ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे.

कोणत्याही स्वरुपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला, २०२५-२६ चा ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. यात ३७२२ कोटी ९३ लाख महसुली खर्च आणि १९२१ कोटी ४१ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे. नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे पीपीपी तत्वाव राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे.

२०२४-२५ चे ५०२५ कोटी १ लाख चा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभिच्या शिल्लकेसह ६५५० कोटी व २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ५६४५ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक व शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभुत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत.
अर्थसंकल्प सादर करतांना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकासकामांसाठी निधी मंजुर झाला आहे, किंवा मिळाला त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पीटल, गडकरी रंगायतन, तलाव संवर्धन आणि सुशोभिकरण, हरित ठाणे उपक्रम, एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नव्याने महापालिकेच्या माध्यमातून कोलशेत येथे अ‍ॅम्युजेमंट पार्क, स्रो पार्क प्रकल्प, दादोजी कोंडदेव स्टेडीअम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब, एमआरटीएस ने आरक्षित भुखंडावर इनडोअर स्पोर्ट्स क्लब व वाचनालय, ठाणे टाऊन पार्क, व्हिवींग टॉवर अ‍ॅण्ड कन्व्हेंशन सेंटर आदी प्रकल्प हे पीपीपीच्या माध्यमातून करण्यावर महापालिकेने भर दिल्याचे दिसत आहे.

वाहतूक कोंडी मुक्त ठाणे करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असून, त्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ठाणे घोडबंदर रस्त्यांचे दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रस्त्यांचे मुख्य रस्त्यामध्ये समावेश, घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वेचा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, अंतर्गत मेट्रो, मुख्य मेट्रो, ठाणे बोरीवली टनेल, कोस्टल रोड आदींच्या कामांमुळे येत्या काळात ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्यावर भर देण्यात येणार आहे.
मागील वर्षी ठाणे महापालिकेने अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरले होते. परंतु प्रत्यक्षात पालिकेला ९१४ कोटी अनुदानापोटी मिळाल्याने आता पुन्हा २०२५-२६ मध्ये ६१२ कोटी ५९ लाख इतके अनुदान अपेक्षित धरले आहे. यात पायाभुत सुविधांसाठी ३०० कोटी, कळवा रुग्णालय ३ कोटी, एकात्मिक स्मशानभुमी नुतनीकरण १० कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम १२ कोटी १९ लाख, १५ वा वित्त आयोगा २६ कोटी, एमएमआरडीएकडून १ कोटी, नागरी सेवा सुविधांसाठी २५ कोटी, अमुत योजना २ साठी ४८ कोटी ५२ लाख, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत तलावांचे संवर्धन ५ कोटी ६२ लाख अपेक्षित धरण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

अनिल परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी – Pravin Darekar

….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत! – CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss