मुंब्र्यातील शिवसेना शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे त्याठिकाणी पोहचेल असून त्याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मुंब्र्याच्या शाखेबाहेर एकवटले आहेत. आजच उद्धव ठाकरे यांचे मुंब्र्यातील बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन दोन्ही गटांनी परस्परांना इशारे दिले आहेत. मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंब्र्यात शिवसेना शाखेबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी आणि नरेश म्हस्के यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. “ठाण्याचा विकास कसा झाला हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं, माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांना अभिमान वाटेल, एकेकाळी माझ्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केला,” असे यावेळी नरेश म्हस्के म्हणाले.
हे ही वाचा :
सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार
शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.