spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Thane Train Accident: मित्रांसोबत रुळावर फोटो काढत असताना भरधाव एक्स्प्रेसच्या धडकेत जागीच मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर येथील उडाणपुलाखाली नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी काढायला गेलेल्या एका तरुणाचा भरधाव एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

Thane Train Accident: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ बदलापूर येथील उडाणपुलाखाली नातेवाईक आणि मित्रांसोबत रेल्वे रुळावर सेल्फी काढायला गेलेल्या एका तरुणाचा भरधाव एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. २४ वर्षीय तरुणाला लांब पल्ल्याच्या ट्रेनने धडक दिल्याने त्याचा दुद्रैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव साहिर आहे. २४ वर्षीय साहिर फोटो काढत असताना अचानक मागून भरधाव एक्सप्रेस आली.

सदर घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान उड्डाणपुलाखाली ही घटना घडली असल्याची माहिती कल्याण येथील रेल्वे पोलीस (जीआरपी) अधिकाऱ्याने दिली. रेल्वे रुळावर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा भरधाव ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर सेल्फी घेत असताना या २४ वर्षीय तरुणाला लांब पल्ल्याच्या ट्रेनने धडक दिल्याने दुद्रैवी मृत्यू झाला आहे, पोलिसांनी गुरुवारी (६ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकट खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जीआरपी जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी साहिरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, या घटनेत साहिर अली नावाच्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिर अली हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात नातेवाईकांना भेटायला आला होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना केल्या जातात की रेल्वे रुळाजवळ जाऊ नका, रेल्वे रुळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा, पण तरीही नागरिक अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अशा भीषण घटना घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं या घटनांवरुन दिसून येते. या घटनेमुळे अंबरनाथ बदलापूर परिसरात भीतीचे वातावरंण तयार झाले आहे. नागरिकांकडून या नियमांबदल काटेकोरपणे पालन होते की नाही हे प्रशासनाने काटेकरूपाने पहिले पाहिजे.

हे ही वाचा :

Eknath Shinde यांच्या होमग्राउंडवर BJP सक्रिय होण्यास सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss