Shivsena Leader Satish Pradhan Passed Away: शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर माजी खासदार सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. सतीश प्रधान यांचा जन्म २९ ऑगस्ट १९४० रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते शिवसेनेचे होते आणि राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते.
शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत बजावली होती महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवसेना नेते तसेच ठाणे महानगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, त्याच सोबत ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन झाले आहे. दुपारी 2 च्या सुमारास सतीश प्रधान यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सतीश प्रधान यांचे दुपारी दोन वाजता निधन झाले असून सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवसस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेना व ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
सतीश प्रधान यांची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले आहे. सतीश प्रधान यांनी ठाण्यात अनेक विकासकामे केली आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालय १९८० साली त्यांनीच स्थापन केले. ठाणे शहरात महापौर मॅरथॉन त्यांनीच सुरू केली होती. सतीश प्रधान यांच्या पश्चात त्यांचा मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. सतीश प्रधान यांच्या जाण्याने कुटुंबीयांमध्ये तसेच ठाण्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका