शिवसेना शिंदे गटाचे माजी शहराध्यक्ष महेश गायकवाड हे अंबरनाथमधील आनंद नगर येथे एका सामूहिक विवाह समारंभासाठी गेले असता त्यांच्या हातामध्ये एका अज्ञात व्यक्तीने एक लिफाफा दिला. नागरिक आपली समस्या महेश गायकवाड यांना निवेदनाद्वारे देत असल्याने त्यांनी हा लिफाफा पहिला नाही. शनिवारी त्यांनी हा लिफाफा उघडून पहिला असता त्यात धमकीचे पात्र असल्याचे उघडकीस आले. त्यांनतर महेश गायकवाड यांनी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्धीकी होईल असे धमकीचे पत्र कल्याणच्या महेश गायकवाडांना आलं आहे. हे पत्र जेलमधून भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांनीच पाठवलं असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. हा गंभीर प्रकार असताना पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे त्यावेळचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. या दोघांच्या एका ५० गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले असता हा गोळीबार झाला होता.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.