Friday, March 29, 2024

Latest Posts

Jitrendra Avhad यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा, आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?

काल दिनांक २ मे रोजी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ ही उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली होती.

काल दिनांक २ मे रोजी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ ही उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी खळबळ ही उडाली होती. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणत घोषणाबाजी देखील केली होती. शरद पवनी त्यांचा हा राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रमक भूमिका घेतली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. परंतु राज्यातील बहुतांश ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी मागणी केली आहे. तर ठाण्यातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा हा दिला आहे.

शरद पवार यांनी २-३ दिवसाचा वेळ हा विचार करण्यासाठी मागितला आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे राजीनामावर ठाम असल्याचाही बोलले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्ये तसेच नेते मंडळी त्यांच्या पदाचा राजीनामा हा देत आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा हा दिला आहे. त्यांच्या सोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा हा दिला आहे. तसेच यावेळी जितेंद्र आव्ह्ड यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. सध्या राज्यात संस्कृतीहीन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आर्थिक, उद्योग, राजकीय या सर्वच क्षेत्रात नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे, त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे. कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे शरद पवार हेच आपणाला सांगत आले आहेत. आज कोणाचाही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार! शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आम्हास बळ देत आहे. माझा राजकीय प्रवास शरद पवार या नावाने चालू आहे. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच आम्ही आजही सांगत आहोत की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, असे ही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचा राजीनामा देत म्हंटलंय, आपण लोक जी भूमिका घेतात त्या सोबत राहील पाहिजे असा आग्रह शरद पवार यांचा असतो. आमचा ही तोच आग्रह आहे. शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, जनमताचा आदर केला पाहिजे. पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये, आमचा प्रवास शरद पवार यांच्या सुरू होतो तेथेच थांबतो. मला नाही माहित कोण काय करतंय असे अजित पवार यांच्या भूमीकेवर मत मांडलं. पाऊल मागे घ्यावं ही अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी राजीनामे देत आहे. समिती मध्ये सुध्दा मी माझं मत मांडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारण केंद्रं बिंदू शरद पवार असणे ही महाराष्ट्राची गरज आहे . मी मानसशास्त्रज्ञ नाही पण आजारपणाच कारण चुकीचे आहे. पण शेवटी शरद पवार जे म्हणतील ते अंतिम असेल, पण आम्हाला विश्वासात न घेता त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्याचा अधिकार नाही.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss