spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

Thane जिल्ह्यातील Vidhansabha मतदारसंघात एकूण 56.05 टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडले. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण 56.05 टक्के मतदान झाले असल्याचे माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक  शिनगारे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
  • 134 भिवंडी ग्रामीण – 69.01
  • 135 शहापूर अ.ज  – 68.32
  • 136  भिवंडी पश्चिम – 54.1
  • 137  भिवंडी  पूर्व – 49.2
  • 138 कल्याण पश्चिम  – 54.75
  • 139  मुरबाड  – 64.92
  • 140 अंबरनाथ – 47.75
  • 141 उल्हासनगर – 54
  • 142 कल्याण पूर्व – 58.50
  • 143 डोंबिवली –  56.19
  • 144 कल्याण ग्रामीण – 57.81
  • 145 मिरा भाईंदर – 51.76
  • 146ओवळा माजिवडा – 52.25
  • 147 कोपरी पाचपाखाडी – 59.85
  • 148 ठाणे – 59.01
  • 149 मुंब्रा कळवा  – 52.01
  • 150 ऐरोली – 51.5
  • 151 बेलापूर – 55.24
मतदानाच्या या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या सर्व मतदारांचे, सर्व राजकीय पक्षांचे त्यांच्या प्रतिनिधींचे, सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे, पोलीस विभागाचे, शिक्षकांचे, विशेषतः महिलांचे आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी विशेष आभार मानले.

Latest Posts

Don't Miss