Friday, April 19, 2024

Latest Posts

Central Railway ची वाहतूक ठप्प, अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक रूमला आग

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक रूमला आग

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही जर मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मध्य रेल्वे स्थानकांदरम्यान (Central Railway Station) तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक रूमला आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. हि आग इतकी मोठी लागली होती कि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मध्य रेल्वे वरील अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मोठी घटना घडली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक रूमला आग लागली आहे. सध्या ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. ही संपूर्ण आग आटोक्यात आण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. या घटनेमुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)


अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आलेली. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आग लागली त्या परिसरात धुराचे मोठे लोळ उसळले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना धडकी बसली आहे. आगीच्या घटनेमुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग हा पूर्णपणे बंद झाला आहे. हा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे. कारण ही वेळ गर्दीची असते. लाखो प्रवाशी आपापल्या कार्यालयांतून घरी जायला निघतात. अशावेळी रेल्वे वाहतूक संथ गतीने चालत असेल तर प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. संबंधित घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तासभर रेल्वे गाडी उभी होती. प्रवाशांची प्रचंड गर्दी फलाटावर बघायला मिळाली.

हे ही वाचा :

RCBvsDC, कोण हुकणार प्लेऑफपासून आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

Scorpion Bite, अरे बापरे!, एअर इंडियाच्या विमानात महिलेला विंचवाने घेतला चावा

Roadies १९ मधून का केलं रिया चक्रवर्तीला बॉयकोट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss