महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्यानंतर दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथील दरे या त्यांच्या गावी गेले. तिथूनच राजकीय घडामोडींच्या चर्चाना उधाण आले. कोण म्हणतंय एकनाथ शिंदे आजारी आहेत, तर कोण म्हणतंय ते नाराज होऊन गावी गेले, अशा अनेक चर्चा रंगल्या गेल्या. अशातच काल संध्याकाळी एकनाथ शिंदे ठाण्यातील आपल्या घरी परतले. तर राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे आज सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे शिवतारे हे पोलिसांवर संतापले.
विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये जात असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. पोलिसांकडून तुम्ही कोण ? थांबा, अशी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच संतापले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले. “आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला? बरोबर नाही, असे प्रत्येक वेळेस करता तुम्ही, किती वर्षे काम करत आहात ?” अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली.
तर दुसरीकडे महायुती सरकारचा शपथविधी ५ नोव्हेंबरला होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी भाजापचे अनेक नेते दाखल झाले. मंत्रिपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्याचे सांगितले. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राजुल नार्वेकर, अतुल सावे, प्रतापराव चिखलीकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द..
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.