Kalyan मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. मागील एक-दोन महिनांपासून अश्या तक्रारी वारंवार येत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच आता कल्याणमधील Khadakpada परिसरात रात्री एका महिलेवर ३ तृतीयपंथी आणि त्यांच्या साथीदाराने हल्ला केला. त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथी याने महिलेला व तिच्या लहान मुलीला मारहाण केली. सदर, घटनेनंतर महिला भयभीत होऊन पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. या संदर्भात आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
हा धक्कादायक प्रकार ५ दिवसांपूर्वी घडला होता. तक्रारदार गृहिणी खडकपाड्यातील फ्लॉवर व्हॅली (Flower Valley) भागात राहतात. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला घेऊन ही गृहिणी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात जात होती. सोसायटीच्या गेटबाहेर बाहेर पडताच कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात राहणाऱ्या तिघा तृतीयपंथीय आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका साथीदाराने या गृहिणीला अडवले. खडकपाडा परिसरात तिघा तृतीयपंथीय आणि त्यांच्या साथीदाराने एका महिलेला अडवत तिच्याकडे २० हजार रुपयांची जबरदस्तीने मागणी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली, एवढंच नव्हे तर पुढे त्यांनी अश्लील वर्तन करत त्या महिलेसह तिच्या लहान मुलीला ही मारहाण केली. या भयानक प्रकारामुळे कल्याण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिक तर जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिलेने पैसे देण्यास इन्कार केल्यानंतर त्या चौघांनी मिळून गृहिणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.नंतर शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. पुढे २० हजार रूपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. इतकेच नव्हे तर तृतीयपंथीयांनी गृहिणीशी अश्लील वर्तन करत तिच्या लहान मुलीला सुद्धा मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे ही महिला प्रचंड घाबरली, मात्र आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये , आणि त्या तृतीयपथीयांच्या गुंडगिरीला आळा बसावा म्हणून त्या महिलेने तृतीय पंथीयांविरुद्ध त्यांच्या संस्थेच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती. मात्र आपल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे लक्षात आल्यावर गृहिणीने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गंबीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
Dandruff समस्येसाठी करा हा रामबाण उपाय